Mhada Exam case | डॉ. प्रीतिश देशमुख ‘घरातील वस्तू’ या कोडवर्डने एजंटला विकणार होता परीक्षेचा पेपर

डॉ. प्रीतिश देशमुख याने म्हाडा पेपरच्या संदर्भात एजंट सोबत संपर्क साधताना विशेष कोडवर्डचा वापर केला होता. देशमुख हा एजंट सोबत बोलताना 'घरातील वस्तू; कोडवर्डचा वापर करायचा. घर म्हणजे म्हाडा व वस्तू म्हणजे पेपर असा त्याचा अर्थ होता.

Mhada Exam case | डॉ. प्रीतिश देशमुख घरातील वस्तू या कोडवर्डने एजंटला विकणार होता परीक्षेचा पेपर
मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांची सोडत निघणार
| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 2:27 PM

पुणे – म्हाडा भरती परीक्षा प्रकरणी अटकेत असेलेलया जी. ए. सॉफ्टवेअरचा डॉ. प्रीतिश देशमुखचाही पेपर फोडण्याच्या कटामध्ये सहभाग असल्याचे तपासात सिद्ध झाले आहे.  म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी देशमुख याने तब्बल १० एजंट सोबत संपर्क साधल्याचे समोर आले आहे. सर्वात धक्कादायकबाब म्हणजे पैसे घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत पेपर कोरा सोडण्यास सांगण्यात आले होते. या विद्यार्थ्यांकडून एजंट पैसे घेऊन त्यांच्या ओएमआरशीटमध्ये   मार्क भरले जाणार होते. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेत पास केलं जाणार होत.

‘घरातील वस्तू’ असा होता कोडवर्ड

डॉ. प्रीतिश देशमुख याने म्हाडा पेपरच्या संदर्भात एजंट सोबत संपर्क साधताना विशेष कोडवर्डचा वापर केला होता. देशमुख हा एजंट सोबत बोलताना ‘घरातील वस्तू; कोडवर्डचा वापर करायचा. घर म्हणजे म्हाडा व वस्तू म्हणजे पेपर असा त्याचा अर्थ होता. जेव्हा पोलिसांनी देशमुखसह हरकळ बदर्सला अटक केली तेव्हा त्यांच्या फोनवर अनेक फोन येत होते . ज्यामध्ये घरातील वस्तू कुठे आहे, कधी मिळणार घरातील वस्तू अशी विचारणा केली होती.

या वस्तू केल्या जप्त

पोलिसांनी देशमुख यांच्या पिंपरीतील घरावर छाप मारला आहे. यावेळी घराची झडती घेण्यात आली. त्यात ४ पेन ड्राईव्ह, टॅब, मोबाइल जप्त केला आहे. या वस्तूंचा पंचनामा केल्यानंतर, त्या ओपन कल्यावर अधिक माहितीसमोर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Bank Workers Strike : बँकांच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी आक्रमक,बँका दोन दिवस बंद राहणार

Yoga Poses : कंबर आणि पाठदुखीतून मुक्त व्हायचंय? मग नियमित करा ही 5 योगासनं

MNS: पुणे मनसेच्या फायरब्रँड नेत्याच्या हाती बाण का घड्याळ? काय म्हणाल्या रुपाली पाटील?