बंधाऱ्यावर मोटार बसवण्यासाठी गेलेल्या बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमके काय घडले?

| Updated on: Dec 15, 2022 | 4:50 PM

घटना घडण्याच्या आधी सतत सहा वेळा लाईट गेली होती. घटनास्थळी महसूल, महावितरण, राजगड पोलीस आरोग्य विभाग दाखल होत अधिक तपास करत आहेत.

बंधाऱ्यावर मोटार बसवण्यासाठी गेलेल्या बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमके काय घडले?
शॉक लागून बापलेकासह चौघांचा जागीच मृत्यू
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : बंधाऱ्यामध्ये मोटार बसवण्यासाठी गेले असता शॉक लागून बापलेकासह चौघांचा मृत्यू झाल्याची घटना पुण्याच्या भोर तालुक्यातील निगडे गावात घडली आहे. विठ्ठल सुदाम मालुसरे (45), सनी विठ्ठल मालुसरे (26), आनंदा ज्ञानेश्वर जाधव (55), अमोल चंद्रकांत मालुसरे (36) अशी मयत चौघांची नावे आहेत. चौघांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

चौघे जण नदीत मोटार ढकलत होते

भोर तालुक्यातील निगडे गावात गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात विठ्ठल मालुसरे, सनी मालुसरे, आनंदा जाधव, अमोल मालुसरे हे चौघे मोटार ढकलत होते. यावेळी अचानक गेलेली वीज परत आली. यामुळे पाण्यात वीजप्रवाह उतरला.

पाण्यात मोटार ढकलत असताना वीजेचा शॉक लागला

यामुळे पाण्यात मोटार ढकलत असलेल्या चौघांना वीजेचा शॉक लागला आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये बापलेकांचा समावेश आहे. एकाच वेळी गावातील चौघा शेतकऱ्यांचा जीव गेल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

याप्रकरणी अधिक तपास सुरु

घटना घडण्याच्या आधी सतत सहा वेळा लाईट गेली होती. घटनास्थळी महसूल, महावितरण, राजगड पोलीस आरोग्य विभाग दाखल होत अधिक तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.