बिबट्याचा भात कापणी करणाऱ्या सासू-सुनेवर हल्ला, सासूचा जागीच मृत्यू; सून गंभीर जखमी

बिबट्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात मानवीहानी होण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. आता ताजा हल्ला जुन्नरच्या आदीवासी भागात घडली आहे.

बिबट्याचा भात कापणी करणाऱ्या सासू-सुनेवर हल्ला, सासूचा जागीच मृत्यू; सून गंभीर जखमी
leopard attacked in pune junnar
| Updated on: Nov 25, 2026 | 10:15 PM

सुनील ठिगळे, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी :  पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एकदा समोर एका व्यक्तीचा बळी गेला आहे. शेतात भात कापणीचं काम करणाऱ्या सासू आणि सुनेवर बिबट्याने अचानक जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात ५५ वर्षीय सासूचा जागीच मृत्यू झाला तर ३५ वर्षीय सून गंभीर जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात, पिंपळगाव जोगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भोईरवाडी येथे बुधवारी दुपारी घडली.

भिमाबाई जिजाभाऊ भोईर आणि त्यांची सून अश्विनी सुरेश भोईर या दोघी शेतात नेहमीप्रमाणे भात कापणी करत होत्या. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दोघींवर झडप घातली. यावेळी बिबट्याने इतका वेगाने आणि भयानक हल्ला केला की भिमाबाई भोईर यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अश्विनी भोईर या घाबरुन पळताना पडल्याने त्यांता हाताचे हाड मोडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

Loading...

बिबट्याचा हल्ला इतका भीषण होता की, बिबट्याने खाली बसून शेतात काम करणाऱ्या भिमाबाई भोईर यांच्या गळ्यालाच आपल्या जबड्यात पकडले. त्यामुळे बिबट्याच्या तीक्ष्म दातांनी त्यांच्या गळ्याला मोठी गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच उपचाराविना मृत्यू झाला. तर त्यांची सून अश्विनी भोईर या पळताना पडल्याने त्यांच्या हाताचे हाड मोडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासणी सुरु केली आहे.

बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे भोईरवाडी आणि पिंपळगाव जोगा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शेतात काम करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे वाढते हल्ले आणि मानवी जीवितहानी रोखण्यासाठी वनविभाग आता काय उपाययोजना करणार, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. या बिबट्याच्या प्रादुर्भाव या भागात गेली अनेक वर्षे होत आहे. या बिबट्यांची संख्या अलिकडे प्रचंड वाढ होत आहे.

बिबट्यांचे वागणे बदलले

ऊसाच्या मळ्यात बिबट्याची मादी पिल्लांना जन्म देत असल्याने आणि त्यांचा जन्मदर देखील जास्त असल्याने बिबटे आता भक्ष्यासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याचे उघडकीस आले आहे. बिबटे त्यांच्या उंची एवढ्या सावजावर हल्ला करतात,त्यामुळे एकांत ठिकाणी काम करताना नेहमी एखाद्या व्यक्तीला हातात काठी घेऊन पहाऱ्यासाठी उभे रहाण्यास सांगावे आणि सावध राहुनच योग्य सुरक्षेत शेतीची काम करावीत असे आवाहन करण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us