इंदापूर तालुक्यातील ‘त्या’ हत्येचा अखेर उलगडा, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; भावानेच केली हत्या

| Updated on: Jan 07, 2022 | 6:01 PM

सहा महिन्यांपूर्वी इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे गावात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.

इंदापूर तालुक्यातील त्या हत्येचा अखेर उलगडा, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; भावानेच केली हत्या
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
Follow us on

पुणे : सहा महिन्यांपूर्वी इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे गावात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुजित जगताप असे या हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. त्याच्या चुलत भावानेच त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

हत्येचे कारण अस्पष्ट

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सहा महिन्यांपूर्वी इंदापूर लातुक्यातील शेटफळगडे गावात सुजित जगताप या तरुणाची हत्या करण्यात आली होती. आरोपीने कोणताही पुरावा मागे न ठेवल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आवाहन होते. मात्र अखेर पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे. या हत्या प्रकरणात आरोपीचा चुलत भाऊ असलेल्या किशोर जगताप याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर सुजित जगताप याच्या हत्येचा आरोप आहे. दरम्यान त्याने हत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

यापूर्वीही घेतले होते चौकशीसाठी ताब्यात 

दरम्यान या प्रकरणात सुरुवातीपासूनच पोलिसांना मृताचा चुलत भाऊ किशोर जगताप याच्यावर संशय होता. त्याला चौकशीसाठी अनेकदा पोलिसांनी ताब्यात देखील घेतले होते. मात्र पोलीस त्याच्याकडून काही ठोस अशी माहिती काढू शकले नव्हते. मात्र खूनाचा उलगाडा झाल्याने पोलिसांनी अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

संबंधित बातम्या

काय राव गुरुजी, तुम्हीही जुगारात? संताप व्यक्त करावा की आश्चर्य? जिल्हा परिषदेने दिला दणका!

Ichalkaranji Murder : तीस रुपयांसाठी जीव घेतला, दारुला पैसे न दिल्याचा राग, तरुणाकडून भिकार्‍याची हत्या

86 व्या वर्षी वडिलांनी मॅरेज ब्युरोत नाव नोंदवलं, पुण्यात पोराने बापालाच संपवलं