Pune Crime | कोयता गँगमध्ये वर्चस्वाची लढाई, म्होरक्याची कोयत्यानेच हत्या

| Updated on: Mar 18, 2024 | 10:51 AM

Pune Crime Indapur Firing: कोयता गँगचा म्होरक्या असलेल्या अविनाश धनवे हा हॉटेलमध्ये जेवणासाठी बसला असताना त्याची हत्या झाली. आधी त्याच्यावर गोळ्या चालवण्यात आल्या. त्यानंतर कोयत्याने त्याची हत्या करण्यात आली.

Pune Crime | कोयता गँगमध्ये वर्चस्वाची लढाई, म्होरक्याची कोयत्यानेच हत्या
अविनाश धनवे याची हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली.
Follow us on

इंदापूर, पुणे | 18 मार्च 2024 : पुणे शहराप्रमाणे जिल्ह्यात कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. पुण्यातील इंदापूरमध्ये शनिवारी धक्कादायक घटना घडली होती. कोयता गँगचा म्होरक्या असलेल्या अविनाश धनवे हा हॉटेलमध्ये जेवणासाठी बसला असताना त्याची हत्या झाली. आधी त्याच्यावर गोळ्या चालवण्यात आल्या. त्यानंतर कोयत्याने त्याची हत्या करण्यात आली. अविनाश धनवे हा कोयता गँगचा आळंदीमधील म्होरक्या होता. त्याचा अंत कोयत्यानेच झाला. दरम्यान या प्रकरणी धनवे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून 10 जणांविरोधात इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कशी झाली होती हत्या

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्यवळणावर हॉटेल जगदंबा आहे. या हॉटेलमध्ये शनिवारी रात्री ८ वाजता अविनाश धनवे इतर तिघे जेवणासाठी आले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिल्यावर ते गप्पा मारु लागले होते. यावेळी दोन युवक हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी पिस्तूल काढून अविनाशवर गोळ्या चालवल्या. त्यानंतर आणखी काही जण हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी अविनाशवर सपासप कोयत्याने वार केले. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.

दहा जणांवर गुन्हा दाखल

अविनाश धनवे हत्या प्रकरणात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात खुशाल तापकिर, विशाल तापकिर (दोघे रा. आळंदी, ता. हवेली), मयुर पाटोळे (रा. वडमुखवाडी, आळंदी, ता. हवेली), राहुल चव्हाण, देवा सुतार, मयुर मानकर, शिवा बेडेकर, प्रकाश उर्फ पप्पु बनकर (सर्व रा. आळंदी, ता. हवेली), सतिष पांडे, प्रणिल उर्फ बंटी मोहन काकडे (रा. फलटण, ता. सातारा) यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

का केली हत्या

अविनाश धनवे याने गेल्या काही वर्षांपासून दहशत निर्माण केली होती. त्याने कोयता गँग तयार केली होती. या परिसरात गुन्हेगारी टोळ्या तयार झाल्या होत्या. या टोळ्यांमध्ये वर्चस्वाची आणि श्रेयवादाची लढाई सुरु झाली. त्यातून कोयता गँगचा मोरक्या असलेल्या अविनाश याचा कोयत्यानेच हत्या झाली. अविनाश धनवे एका प्रकरणात चार वर्षे येरवडा कारागृहामध्ये होता. महिन्यापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली होती.

हे ही वाचा

पुण्यात खळबळ, हॉटेलमध्ये जेवणासाठी बसला, कारमधून आलेल्यांनी गोळ्या घातल्या, CCTV मध्ये थरार