मेट्रो कारशेडमध्ये लोखंडी गज उतरवताना अपघात, पिंपरीत 27 वर्षीय कामगाराचा मृत्यू

| Updated on: Jan 02, 2022 | 2:03 PM

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरामधील मेट्रो डेपो शेडमध्ये हा अपघात झाला. अपघातात एका 27 वर्षांच्या कामगाराचा मृत्यू झाला. एकलाश नजिर शेख अस मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव आहे.

मेट्रो कारशेडमध्ये लोखंडी गज उतरवताना अपघात, पिंपरीत 27 वर्षीय कामगाराचा मृत्यू
पिंपरीत मेट्रो कारशेडमध्ये अपघात
Follow us on

पिंपरी चिंचवड : मेट्रो डेपो शेडमध्ये झालेल्या अपघातात 27 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. क्रेनच्या सहाय्याने लोखंडी गज उतरवत असताना पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात हा अपघात झाला. क्रेन चालकाच्या निष्काळजीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरामधील मेट्रो डेपो शेडमध्ये हा अपघात झाला. अपघातात एका 27 वर्षांच्या कामगाराचा मृत्यू झाला. एकलाश नजिर शेख अस मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव आहे.

नेमकं काय घडलं?

मेट्रो डेपो शेडमध्ये मेट्रोसाठी तयार करत असलेल्या सिमेंट उड्डाणपुलाच्या बांधकाम साईटवर कंटेनरमधून आलेले लोखंडी सळई गँट्री क्रेनच्या सहाय्याने खाली उतरवले जात होते. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजनांसह डोक्यावर हेल्मेट परिधान करुनही ऑपरेटर सुधीर कुमार विनोद रॉय (रा. पिंपळे गुरव, पुणे) यांने निष्काळजीपणाने हयगय केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

कोणतीही काळजी न घेता त्याने एका साईडचा लोखंडी सळईचा बंडल जास्त उंचीवर उचलला. त्यावेळी दुसऱ्या साईडचा बंडल उचलला गेला नाही. यातच त्या बंडलचा बॅलन्स न झाल्याने तो हूक लावणारा एकलाश नजीर शेख याच्या डोक्यावर जोरात पडला. गंभीर जखमी झालेल्या एकलाशचा मृत्यू झाला.

मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी

मयत एखलाश नजिर शेख हा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी होता. त्याच्या मृत्यू संदर्भात क्रेन चालकाविरुद्ध सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

खळबळजनक ! आधी आईला औषधाचा ओव्हरडोस दिला नंतर पॉलिथीनच्या पिशवीत तोंड बांधलं, पुढं जे घडलं त्यानं पुणे हादरलं

CCTV | घराबाहेर उभ्या तरुणांच्या अंगावर बुलेट घातली, उल्हासनगरात पोलिसांची दादागिरी

पोटच्या दोन मुलांना बिल्डिंगच्या 15 व्या मजल्यावरुन फेकलं, सैतान बापासह प्रेयसीला फाशी