पिंपरीतील पेट्रोल बॉम्बचे गूढ उकलले, माजी नगरसेवकाने बर्थडे केक न कापल्याच्या रागातून हल्ला

पिंपरी चिंचवडमध्ये काही दिवसांपूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी पुण्यातील सांगवी पोलिसांनी दोन अल्पवयीन गुन्हेगारांशिवाय आणखी तीन जणांना अटक केली आहे.

पिंपरीतील पेट्रोल बॉम्बचे गूढ उकलले, माजी नगरसेवकाने बर्थडे केक न कापल्याच्या रागातून हल्ला
माजी नगरसेवकाच्या कार्यालयवर पेट्रोल बॉम्ब फेकल्याप्रकरणी कारवाई
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 7:33 AM

पिंपरी चिंचवड : वाढदिवसाचा केक कापला नाही म्हणून पेट्रोल बॉम्ब फेकल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन गुन्हेगारांसह पाच जणांना अटक केली आहे. पिंपरी चिंचवडमधील भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या कार्यालयावर हा बॉम्ब टाकण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात हा प्रकार घडला होता.

काय आहे प्रकरण?

पिंपरी चिंचवडमध्ये काही दिवसांपूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी पुण्यातील सांगवी पोलिसांनी दोन अल्पवयीन गुन्हेगारांशिवाय आणखी तीन जणांना अटक केली आहे.

जगतपा केक न कापता गेल्याचा राग

अटक केलेल्या आरोपींपैकी प्रद्युम्न भोसले याच्या वाढदिवशी तो शंकर जगताप यांच्या हस्ते केक कापण्यासाठी त्याच्या मित्रांसह गेला होता. पण शंकर जगताप केक न कापताच निघून गेल्याने तो संतापला होता. त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. सूड घेण्याबरोबरच झटपट पैसे कमावण्याचाही त्याचा हेतू होता.

विरोधकांकडून पैसे उकळण्याचाही मनसुबा

प्रद्युम्न याच्या एका मित्राने दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या कार्यालयावर हल्ला केला होता. तेव्हा विरोधकांचे नाव न घेण्यासाठी त्याला भरघोस पैसे मिळाले होते. त्याच पद्धतीने शंकर जगताप यांच्या विरोधकांकडून पैसे कमावण्याचा उद्देशही या हल्ल्यामागे असल्याची माहिती आहे. प्रद्युम्न भोसले याच्यासह या प्रकरणी तन्मय मदने, विक्रम जवळकर आणि आणखी दोन अल्पवयीन आरोपी पोलिसांनी अटक केले आहेत. सांगवी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

पुणे सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने 5 जणांना चिरडलं; तीन जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मॅट्रोमोनिअल साइटवरील ओळख भोवली ; गुंगीचे औषध देत तरुणीवर केला बलात्कार

बारामतीत वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई ; दलाल महिलेला अटक, तरुणीची सुटका