दोघा चोरट्यांनी एवढ्या दुचाकी चोरल्या की, पोलिसांनी डोक्यालाच हात लावला; गुन्हेही एवढे की…

| Updated on: Mar 28, 2023 | 10:17 PM

ज्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर या कारवाईत तब्बल 21 गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोघा चोरट्यांनी एवढ्या दुचाकी चोरल्या की, पोलिसांनी डोक्यालाच हात लावला; गुन्हेही एवढे की...
Follow us on

पिंपरी-चिंचवड : पुणे शहरासह पिंपरी चिंचवड परिसरात सध्या गु्न्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यात भूरट्या चोऱ्यांसह मोठ्या चोऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात चोरट्यांनी धूमाकूळ घातला असल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरी भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली असतानाच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनने चांगली कामगिरी करत शहरात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अट्टल चोरट्यांना वेगवेगळ्या ठिकाणी अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनने कारवाई करत दोघा अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ज्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून 25 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर या कारवाईत तब्बल 21 गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुचाकी चोरीच्या प्रकरणात प्रदीप गायकवाड आणि आकाश घोडके अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडे आणखी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

प्रदीप गायकवाड या चोरट्याकडून पोलिसांनी तब्बल 21 दुचाकी जप्त केल्या आहेत तर आकाशकडून पोलिसांनी चार दुचाकी जप्त केल्या आहेत. एवढ्या दुचाकी चोरल्या कशा असा सवाल पोलिसांनी उपस्थित केला असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होतात का त्याची चौकशी सध्या सुरु करण्यात आली आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया,पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्न गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम,उपनिरीक्षक गणेश माने, गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अंमलदार केराप्पा माने, शिवानंद स्वामी,दीपक खरात, दिलीप चौधरी, संतोष इंगळे, प्रमोद वेताळ, उषा दळे, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, विपुल जाधव, देवा राऊत, अतिश कुडके, सागर अवसरे, नामदेव कापसे, शिवाजी मुंढे, अजित सानप, संदेश देशमुख, उद्धव खेडेकर यांनी ही कामगिरी केली आहे.