AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या धाडसाचं कौतुक करावं तितकं कमी! प्राणघातक हल्ला केलेल्या बिबट्याला महिलेनं परतावून लावलं

Pune leopard attack : बिबट्याच्या हल्ल्या परतावून लावून ही महिला बचावली आहे. मात्र या महिलेच्या डोक्याला गंभीर जखम झाली. या महिलेच्या डोक्याला टाके पडलेत.

या धाडसाचं कौतुक करावं तितकं कमी! प्राणघातक हल्ला केलेल्या बिबट्याला महिलेनं परतावून लावलं
बिबट्याचा हल्लाImage Credit source: instagram
| Edited By: | Updated on: Sep 06, 2022 | 10:57 AM
Share

पुणे : पुणे (Pune District) जिल्ह्यातील आंबेगाव (Ambegaon) तालुक्यात एक चित्तथरारक घटना घडली. एका बिबट्याने महिलेवर (Leopard attack) प्राणघातक हल्ला केला. पण हा हल्ला परतावून लावण्यात धाडसी महिलेला यश आलंय. आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी येथे ही घटना घडली. घराबाहेर असलेली गाय सोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून जोरदार प्रतिकार केला आणि बिबट्याला परतावून लावलं. कलाबाई देविदास मते असं या धाडसी महिलेचं नाव आहे. या धाडसी महिलेचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

जीव वाचला, पण…

बिबट्याच्या हल्ला परतावून लावून ही महिला बचावली. मात्र या प्राणघातक हल्ल्यात महिलेच्या डोक्याला गंभीर जखम झाली. या महिलेच्या डोक्याला टाके पडलेत. कलाबाई यांच्यावर मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी येथील कलाबाई मते यांचे घर चव्हाणवस्ती येथे असून घराशेजारी वनविभागाचे क्षेत्र आहे. त्यांची गाय ते चरण्यासाठी वन विभागाच्या शेजारी बांधत असतात. रात्री सात वाजताच्या दरम्यान त्या गाय सोडण्यासाठी गेले असता बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने डरकाळी फोडत त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी घाबरून जोरजोरात आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. मात्र या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली.

डोक्याला टाके

मते कुटुंबियांनी त्यांना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांच्या डोक्याला टाके पडले आहेत. उपचार घेऊन त्या घरी आल्या. पण त्यांचं डोकं दुखत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुन्हा उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल करणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

सदर घटनेची माहिती मिळताच, वनविभागाने वन परीक्षेत्राधिकारी पी. एस. रौंदळ यांनी घटनेची गंभीर दखल घेतली. सोमवारी सकाळी पी.एस. रौंदळ, वनपाल एस.एल गायकवाड, वनरक्षक एस.बी वाजे, वनरक्षक ए. एस.होले, आर.सी शिंगाडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या परिसरात बिबट्याचा वावरही आहे. आता वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान वनविभाग क्षेत्र, ऊस क्षेत्र परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. एकट्याने बाहेर पडू नये, आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावी, असे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी केले आहे.

ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.