बॉयफ्रेंडसाठी आईचं कांड? पोटच्या मुलीचे अश्लील व्हिडीओ केले व्हायरल, ‘बंटी-बबली’चा हादरवून टाकणार कारनामा!
पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका महिलेने प्रियकाराच्या मदतीने स्वत:च्याच मुलीचे अश्लिल व्हिडीओ काढून व्हायरल केले आहेत.
-
-
पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका महिलेने प्रियकाराच्या मदतीने स्वत:च्याच मुलीचे अश्लिल व्हिडीओ काढून व्हायरल केले आहेत.
-
-
विशेष म्हणजे हे व्हिडीओ व्हायरल करून ही महिला आपल्या प्रियकरासोबत फरार झाली होती. या बंटी आणि बबलीला बिबेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
-
-
आईचे व आईचा प्रियकर गुरुदेव स्वामी यांच्या नात्याबद्दल घरमालकिणीला माहिती दिल्याने संबंधित मुलीचा तिच्या आईने मनात राग धरला होता. रागाच्या भरात या संबंधित महिलेने आणि तिचा प्रियकर गुरुदेव स्वामी यांनी घरी कोणी नसताना मुलीसोबत छेडछाड केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीचे अश्लिल व्हिडीओ काढले.
-
-
महिलेने स्वत:च्याच मुलीचे हे अश्लिल व्हिडीओ नातेवाईकांना, बहिणींना, वडिलांना पाठवून दिले. या माध्यमातून मुलीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी महिला आणि तिचा प्रियकर दोघेही फरार झाले होते.
-
-
हे प्रकरण पोलिसांच्या दरबारी गेल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाईला सुरुवात केली. बिबेवाडी पोलिसांकडून फरार असलेल्या आई आणि प्रियकराला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.