Pune Crime : हायवेवर सूसू करायला थांबणाऱ्यांना गाठायचे आणि लुटायचे! मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील दरोडेखोरांना बेड्या

| Updated on: Jun 09, 2022 | 12:04 PM

Pune News : अनेक वाहन चालकांनी शिरगाव-परंदवाडी पोलीसांत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीसांनी सापळा लावून सात जणांच्या टोळीला उर्से टोल परिसरातून अटक केलीय.

Pune Crime : हायवेवर सूसू करायला थांबणाऱ्यांना गाठायचे आणि लुटायचे! मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील दरोडेखोरांना बेड्या
मोठी कारवाई
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे : तुम्ही जर वरचेवर मुंबई-पुणे हायवेने (Mumbai Pune Express Highway) प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई पुणे हायवेवर दरोडेखोरांची (Pune Crime News) एक टोळी सक्रिय होती. या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. हायवेवर सूसू करायला थांबणाऱ्यांना गाठायचं आणि प्रवासी गाडीतून खाली उतरताच त्यांना शस्त्रांचा धाक दाखवयचा. घाबरलेल्या प्रवाशांना लुटायचं आणि पसार व्हायचं, असे प्रकार मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाढले होते. दरम्यान, हायवेवर लुटणार करणाऱ्या टोळीचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. शिरगाव परंदवाडी पोलिसांनी (Pune News) या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मध्यरात्री ही टोळी मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहनांना टार्गेट करत होते. टोळीचा धाक दाखवून लुटमार झाल्याप्रकरणी अनेक तक्रारीही पोलिसांत दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई करत टोळीला जेरबंद केलंय. एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

उर्से टोल नाक्यावर कारवाई

वाहन चालकांना शस्त्राचा धाक दाखवून ही टोळी लुटमार करत होती. शिरगाव परंदवाडी पोलिसांनी लुटमार करणाऱ्या टोळीचा शोध सुरु केला होता. अखेर या टोळीविरोधात धडक कारवाई करत सात जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मध्यरात्रीच्या वेळी प्रवास करताना उर्से टोल नाक्यावर लघुशंकेसाठी वाहनातून खाली उतरताच ही टोळी वाहन चालकांना शस्त्राचा धाक दाखवून धमकावत होती. इतकंच काय तर वाहन चालकांना मारहाण करुन वाहनंही पळवून न्यायची.

हे सुद्धा वाचा

सात जणांना अटक

सात जणांना अटक

याप्रकरणी अनेक वाहन चालकांनी शिरगाव-परंदवाडी पोलीसांत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीसांनी सापळा लावून सात जणांच्या टोळीला उर्से टोल परिसरातून अटक केलीय. संकेत कांबळे, अमोल गोपाळे, अक्षय शेळके, प्रकाश साळुंखे, प्रिन्स यादव, प्रसाद कानगुडे आणि राजा बाग,अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसी खाक्या दाखवताच या सर्वांनी आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिलीय.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच वाहन चोरुन पळ काढणाऱ्या एकाची पोलिसासोबतची झटापटही कॅमेऱ्यात कैद झाली होती. सोमाटे फाट्यावर झालेला हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. यावेळी झालेल्या झटापटीत पोलिसांच्या हाताला जखमी झाली होती. त्यानंतर चोरी झालेलं वाहन टोल नाक्यावर सोडूनच चोरानं पळ काढला होता.

चिखलीकडून तळेगावकडे जात असताना एका व्यक्तींने आपली कार चोरी झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच पाच दिवसांतच पोलिसांनी मोठी कारवाई करत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्यात.