Pune Murder : पुणे शहर तरुणाच्या हत्येनं हादरलं! मध्यरात्री थरारक हत्याकांड, चाकूने भोसकून सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घातला

Pune crime news : डोक्यात सिमेंटचे ब्लाक घालून त्याला ठार मारण्यात आलं.

Pune Murder : पुणे शहर तरुणाच्या हत्येनं हादरलं! मध्यरात्री थरारक हत्याकांड, चाकूने भोसकून सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घातला
संशयातून दीराने वहिनीची हत्या केल्याची घटना गाझियाबाद येथील लोणीमध्ये घडली आहे. Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 1:07 PM

पुणे : पुणे (Pune Crime News) शहर खळबळजनक हत्याकांडाने हादरलंय. एका तरुणाचा भोसकून खून (Pune Murder News) करण्यात आला. पुणे शहरात ही घटना घडल्यानं पोलिसांचा (Pune News) धाक उरलाय की नाही, असाही सवाल उपस्थित केला जातोय. मध्यरात्री तरुणाची हत्या करण्यात आली. यावेळी चाकूने तरुणाला भोसकण्यात आलं. त्यानंतर त्याच्या डोक्यात सिमेंटचे ब्लाक घालून त्याला ठार मारण्यात आलं. काळचारा थरकाप उडणावाऱ्या या हत्याकांडानंतर आता परिसरात भीतीचं वातावरण आहे. नाना पेठेतील नवा वाडा परिसर या हत्येच्या घटनेनं हादरुन गेला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आहे. सध्या अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. तसंत हत्या करण्यात आलेला तरुण कोण होता, याचीही ओळख पटवण्यात आली आहे.

28 वर्षांच्या तरुणाला भोसकलं!

28 वर्षांच्या तरुणाचा नाना पेठेतील नवा वाडा इथे खून करण्यात आला. अक्षय लक्ष्मण व्हलाळ असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. पूर्व वैमन्यातून या तरुणाची हत्या करण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय. या हत्येप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. अक्षयच्या मारेकऱ्यांचा कसून शोध सध्या घेतला जातोय. समर्थ पोलीस ठाण्यात या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. दोघा संशयितांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपींचा शोध सुरु

हत्या करुन मारेकरी पसार झाले आहेत. नवा पेठ परिसरातीत सीसीटीव्ही फुटेजची मदत पोलिसांकडून आता घेतली जाते आहे. तसंच अक्षयच्या परिचयाच्या लोकांकडेही पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे. नेमके या हत्येचं कारण काय? हत्येला जबाबदार कोण? अक्षयचं कुणाशी भांडण झालं होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचं आव्हान आता पुणे पोलिसांसमोर उभं ठाकलंय. महत्त्वाचं म्हणजे पुणे शहराच्या परिसरात हत्याकांड घडलेल्या या घटनेची दाहकता अधिकच वाढली आहे.

Non Stop LIVE Update
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.