AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शारीरिक संबंधाचं शूटिंग, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पुण्यात सहा जणांकडून गँगरेप

आरोपींनी संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. (Pimpri Chinchwad Dehu Road Lady Gang Rape)

शारीरिक संबंधाचं शूटिंग, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पुण्यात सहा जणांकडून गँगरेप
देहू रोड भागात महिलेवर गोठ्यात बलात्कार
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 4:09 PM
Share

रणजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड : देहूरोड परिसरात जनावरांच्या गोठ्यात महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गँगरेप प्रकरणी चौघा जणांना अटक करण्यात आली असून दोघे आरोपी पसार झाले आहेत. शारीरिक संबंधांचा व्हिडीओ शूट करुन व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. (Pune Pimpri Chinchwad Dehu Road Lady Gang Rape blackmailing by threaten to Viral Sex Video Clip)

लैंगिक संबंधाचे व्हिडीओ शूट

अटक आरोपी मुश्ताक सय्यद याने फिर्यादी महिला आणि आरोपी आरबाज खान यांचा शारीरिक संबंध करतानाचा व्हिडीओ शूट केला. ती क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादी महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर इतर आरोपींनी देखील संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

चौघांना अटक दोघे पसार

आरोपी आरबाज खान, सुलतान उर्फ मुश्ताक सय्यद, रियाज ऊर्फ मन्नन खान आणि सोहेल शेरअली पिरजादे यांना अटक करण्यात आली आहे. तर दोन अल्पवयीन आरोपी फरार आहेत. या सर्व आरोपींविरोधात भारतीय दंड विधान, कलम 342, 376 (1), 376 (ड), 377, 323, 504, 506, 120 (ब), आय.टी ॲक्ट 67, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम 3 (1) (12) या अंतर्गत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यवतमाळमध्येही बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, 45 वर्षीय महिलेवर शेत शिवारात बलात्कार करुन आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ शूट केल्याचा घृणास्पद प्रकार गेल्या महिन्यात समोर आला होता. आरोपींनी हा अश्लील व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल केल्याची माहितीही पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीतून पुढे आली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील डेहणी शेत शिवारात हा प्रकार घडला होता. धक्कादायक म्हणजे 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने बलात्काराचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. हा व्हिडीओ पीडितेला दाखवून व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानेही महिलेवर बलात्कार केला होता.

संबंधित बातम्या :

तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन चित्रीकरण, व्हायरल व्हिडीओवरुन महिलेसह पाच जणांना बेड्या

39 वर्षीय आरोपीचा महिलेवर बलात्कार, 17 वर्षीय तरुणाकडून व्हिडीओ शूट, धमकावत लैंगिक अत्याचार

(Pune Pimpri Chinchwad Dehu Road Lady Gang Rape blackmailing by threaten to Viral Sex Video Clip)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.