तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन चित्रीकरण, व्हायरल व्हिडीओवरुन महिलेसह पाच जणांना बेड्या

एका महिलेचे शारीरिक शोषण करणाऱ्या पाच जणांना व्हिडीओ क्लीपच्या आधारे अटक केली, अशी माहिती बंगळुरु पोलिसांनी दिली. (brutal rape and video shoot )

तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन चित्रीकरण, व्हायरल व्हिडीओवरुन महिलेसह पाच जणांना बेड्या
आसाम पोलिसांनी जारी केलेले आरोपींचे फोटो

गुवाहाटी : तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन मारहाण करत या कृत्याचे व्हिडीओ शूट करणाऱ्या पाच नराधमांना अटक करण्यात आली आहे. सामूहिक बलात्काराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर संतापाचा विषय ठरत होता. आसाम पोलिसांनी व्हायरल व्हिडीओतून आरोपींचे फोटो जारी केल्यानंतर बंगळुरुत पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. (Five arrested for brutal rape and video shoot of sexual assault on young woman)

केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी या प्रकरणात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना मदत मागितली होती. अटक झालेल्या पाच आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. एका महिलेचे शारीरिक शोषण करणाऱ्या पाच जणांना व्हिडीओ क्लीपच्या आधारे अटक केली, अशी माहिती बंगळुरु पोलिसांनी दिली.

पीडिता आणि आरोपी बांगलादेशी

पीडिता आणि आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं तपासादरम्यान समोर आलं आहे. सर्व एकाच ग्रुपचे सदस्य होते. मात्र पैशांच्या कारणावरुन भांडणं झाली. त्यानंतर आरोपींनी महिलेचे शारीरिक शोषण केले. मानवी तस्करीसाठी पीडित महिलेला बांगलादेशहून भारतात आणल्याची माहिती आहे.

आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेट

राममूर्ती नगर पोलिसांच्या माहितीनुसार हा व्हिडीओ जवळपास 10 दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यातील आरोपी एका आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटमध्येही सहभागी असल्याचा पोलिसांचा दावा आहे. (brutal rape and video shoot )

यवतमाळमध्येही बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, 45 वर्षीय महिलेवर शेत शिवारात बलात्कार करुन आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ शूट केल्याचा घृणास्पद प्रकार दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातही समोर आला होता. आरोपींनी हा अश्लील व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल केल्याची माहितीही पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीतून पुढे आली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील डेहणी शेत शिवारात हा प्रकार घडला होता. धक्कादायक म्हणजे 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने बलात्काराचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. हा व्हिडीओ पीडितेला दाखवून व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानेही महिलेवर बलात्कार केला होता.

संबंधित बातम्या :

वृद्ध महिलेची हत्या करुन अतिप्रसंग, पुण्यात घृणास्पद प्रकार, आरोपी चार तासात जेरबंद

39 वर्षीय आरोपीचा महिलेवर बलात्कार, 17 वर्षीय तरुणाकडून व्हिडीओ शूट, धमकावत लैंगिक अत्याचार

(Five arrested for brutal rape and video shoot of sexual assault on young woman)