AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी, पुणे पोलीस L3 हॉटेल सील करण्याच्या तयारीत, ड्रग्ज प्रकरणात मोठ्या घडामोडी

विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या हॉटेल, बार आणि पब्समध्ये अल्पवयीन तरुण सर्रासपणे ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे संबंधित प्रकाराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणी पुणे पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे.

सर्वात मोठी बातमी, पुणे पोलीस L3 हॉटेल सील करण्याच्या तयारीत, ड्रग्ज प्रकरणात मोठ्या घडामोडी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 23, 2024 | 6:34 PM
Share

पुण्याच्या L3 हॉटेलचे 2 कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. पुणे ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर मानलं जातं. पुणे शहराला राज्याची सांस्कृतिक राजधानी मानलं जातं. पण या सांस्कृतिक राजधानीत ड्रग्ज विक्रेत्यांचा सुळसुळाट बघायला मिळतोय. एका नामांकीत हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पोलिसांनी L3 हॉटेलमधील 2 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये हॉटेलचा मॅनेजर आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित प्रकाराचे व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरण सिंह राजपूत घटनास्थळी दाखल झाले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर घटनास्थळी दाखल झाले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी पोहोचले. पुणे पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण करण्यात आले. लिक्विड लीजर लाउंज L3 या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत.

पुणे पोलीस L3 हॉटेल सील करण्याच्या तयारीत

पुणे पोलीस L3 हॉटेल सील करण्याच्या तयारीत आहेत. ड्रग्स प्रकरणात L3 हॉटेल सील होण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागगकडून हे हॉटेल आता सील केलं जाणार आहे. पार्टी इथंच झाल्याचं तपासात उघड झाल्याची माहिती मिळत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची माहिती मिळत आहे.

आमदार रवींद्र धंगेकर यांचे गंभीर आरोप

संबंधित प्रकार समोर आल्यानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस आणि उत्पादन शुल्क मंत्री हप्ते घेत असल्याने पुण्यातील अशा अनेक हॉटेल आणि बारमध्ये सर्रासपणे अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे आता नवी खळबळ उडाली आहे. या आरोपांवर आता काय-काय कारवाई केली जाते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...