स्वारगेट अत्याचार प्रकरणात तपासाबाबत पोलिसांकडून मोठा बदल, आता तपासाची सूत्र थेट…

Pune Swargate Rape Case: स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग गेला आहे. गुन्हे शाखेला तातडीने तपास ताब्यात घेण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे.

स्वारगेट अत्याचार प्रकरणात तपासाबाबत पोलिसांकडून मोठा बदल, आता तपासाची सूत्र थेट...
Pune Police Commissioner
| Updated on: Mar 03, 2025 | 2:54 PM

Pune Crime Case Swargate : पुण्यासारखे सांस्कृतिक शहरात २४ फेब्रुवारी रोजी धक्कादायक प्रकार घडला होता. स्वारगेटसारख्या गजबजल्या बस स्टँडवर एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये सकाळी ५:३० वाजता अत्याचार झाला होता. हा प्रकार २५ फेब्रुवारी रोजी समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी घटनेच्या तीन दिवसानंतर अटक केली होती. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके कामाला लागली होती. तो शेतात लपला असल्यामुळे ड्रोनद्वारे त्याचा शोध घेतला जात होता. आता या प्रकरणाच्या तपासाबाबत पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग गेला आहे. गुन्हे शाखेला तातडीने तपास ताब्यात घेण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे.

अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. शिक्रापूर पोलीस ठाण्यात २ गुन्हे त्याच्यावर आहे. तसेच शिरूर, कोतवाली, सुपा आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या प्रकरणात आरोपीकडून आणि त्याच्या कुटुंबियांकडून वेगवेगळे दावे केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे दिला आहे.

पोलिसांकडून स्वारगेट बसस्थानकावर बंदोबस्त

स्वारगेट अत्याचार प्रकरण उघड झाल्यानंतर त्या ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे नेते येत आहेत. आंदोलने केली जात आहे. त्यामुळे खबरदारी घेवून बस स्थानकावर सुरक्षेसाठी पोलीस तैनात केले आहेत. स्वारगेट आगारात अजूनही पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. तसेच स्वारगेट बस स्थानकातील आगारात बंद पडलेल्या बसेस पोलिसांनी हटवल्या आहेत.

कुटुंबियांना पोलीस संरक्षणाची मागणी

स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचे वकील वाजिद खान यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेला दत्तात्रय गाडे याचा भाऊ उपस्थित होता. यावेळी वकील वाजित खान म्हणाले, आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. आरोपीच्या कुटुंबियांनी लोकांकडून त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. दत्तात्रय गाडे याचा भाऊ म्हणाला, दत्ता भाजी विकून येत होता. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. पिडीतेला पण न्याय मिळाला पाहिजे. पण माध्यमांनी नाण्याची दुसरी बाजू दाखवावी. दत्ता जर दोषी असेल तर त्याच्यावरती कारवाई व्हावी.