AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड प्रकरणात पोलिसांना यश, शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या पुतण्यासह चार जणांना अटक

Raksha Khadse Daughter Harassed: मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड प्रकरणात पोलिसांना यश, शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या पुतण्यासह चार जणांना अटक
raksha khadse
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 03, 2025 | 2:13 PM
Share

Raksha Khadse Daughter Harassed: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याचा प्रकार मुक्ताईनगरमधील कोथडी येथील यात्र दरम्यान घडला होता. रविवारी हे प्रकरण समोर आल्यानंतर दोन गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात एकूण सात आरोपी असल्याचे समोर आले. आता पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. त्यात मुख्य आरोपी अनिकेत भोई याचाही समावेश आहे. अनिकेत भोई हा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कट्टर समर्थक आहे. तसेच रावेर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख छोटूभाई यांचा पुतण्या आहे.

आरोपी शिवसेनेचे पदाधिकारी?

खासदार रक्षा खडसे यांच्या मुली सोबत गेलेल्या अंगरक्षक पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी एक गुन्हा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल केला होता. दुसरा गुन्हा मुलींची छेड काढल्या प्रकरणात होता. या प्रकरणात अनिकेत भोई, किरण माळी आणि अनुज पाटील यांच्यासह एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. किरण माळी हा सुद्धा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे.

सात जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. अनिकेत भोई हा या गुन्ह्यातला मुख्य आरोपी आहे. त्याच्या विरोधात यापूर्वी मारहाणीसह वेगवेगळे असे चार गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. दरम्यान, आरोपींची काही राजकीय पार्श्वभूमी आहे का असे विचारले असता पोलीस अधीक्षकांनी त्यावर बोलणे टाळले.

दरम्यान, या प्रकरणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आरोपी माझे कार्यकर्ते असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आपण कोणालाही पाठिशी घालणार नाही, असे त्यांनी म्हटले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?