खेडमध्ये दीडशे फूट उंच टॉवरवर दारूड्याचे दहा तासांचे थरारनाट्य

| Updated on: Mar 20, 2022 | 11:11 PM

आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास एक अनोळखी तरुण केळगाव येथील महावितरणच्या 150 फूट उंच टॉवरवर चढला. याबाबतची माहिती मिळाल्यावर आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्या तरुणाला वारंवार विनंती केल्यावरही तो खाली उतरत नव्हता.

खेडमध्ये दीडशे फूट उंच टॉवरवर दारूड्याचे दहा तासांचे थरारनाट्य
खेडमध्ये दीडशे फूट उंच टॉवरवर दारूड्याचे दहा तासांचे थरारनाट्य
Follow us on

पुणे : दारूच्या नशेत एक तरुण (Youth) महावितरणच्या दीडशे फूट उंच टॉवरवर शनिवारी रात्री 10 वाजता चढला होता. आळंदी पोलीस, महावितरण आणि पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाच्या प्रयत्नानंतर तब्बल 10 तासांनी त्याची सुखरुप सुटका (Rescue) केली. ही घटना खेड तालुक्यातील आळंदी जवळील केळगाव येथे घडली. किशोर दगडोबा पैठणे (30) असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. किशोर हा पुण्यातील वाघोली येथील रहिवासी आहे. (Ten hours of thrilling drama of a drunken youth climbing a 150 feet high tower in Khed)

रविवारी सकाळी 10 तासांनी तरुणाची सुटका

आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास एक अनोळखी तरुण केळगाव येथील महावितरणच्या 150 फूट उंच टॉवरवर चढला. याबाबतची माहिती मिळाल्यावर आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्या तरुणाला वारंवार विनंती केल्यावरही तो खाली उतरत नव्हता. आळंदी येथील अग्निशामक दल हे देहू येथील तुकाराम बीजेकरीता गेले असल्याने आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी पिंपरी चिंचवड अग्निशामक दलास रविवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान वर्दी दिली. त्यानुसार 54 मीटर उंच शिडी असलेले पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र शिडी लावून त्यास खाली उतरविण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे रेस्क्‍यू रोप, हार्नेस व जंपिंग शीट यांचा वापर करून पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांची मनधरणी करून त्यास सकाळी आठ वाजताच्या सुमारास खाली उतरविले.

हायपरटेन्शनमध्ये तरुण टॉवरवर चढला

लग्न जुळत नसल्याने हायटेन्शनमध्ये मद्यपी तरुण टॉवरवर चढल्याची माहिती कळते. लहान मुलाचं लग्न जुळलं असून मोठा मुलगा म्हणजेच किशोर मद्यपान करतो. बऱ्याचदा तो घरी येत नसल्याने त्याचा विवाह जुळत नाही असं त्याच्या आईने पोलिसांना सांगितलं आहे. तब्बल 10 तास या घटनेचे थरारनाट्य सुरू होतं. किशोर हा मानसिक तणावात आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आलंय. (Ten hours of thrilling drama of a drunken youth climbing a 150 feet high tower in Khed)

इतर बातम्या

धुळवड खेळणाऱ्यांची मजा, रिक्षातून जाणाऱ्यांना फुकटची सजा! पाण्यानं भरलेला फुगा रिक्षावर भिरकावला आणि…

Crime | सोलापुरात  सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेने उचलेले टोकाचे पाऊल