Ulhasnagar मध्ये धुळवडीच्या दिवशी हत्याकांड! दारु पिऊन पडून नव्हे, तर डोक्यात वीट घालून हत्या

Ulhasnagar मध्ये धुळवडीच्या दिवशी हत्याकांड! दारु पिऊन पडून नव्हे, तर डोक्यात वीट घालून हत्या
डोक्यात वीट घालून ठेचलं! धुळवडीच्या दिवशी हत्याकांड
Image Credit source: TV9 Marathi

Ulhasnagar murder : कुंदनमल धुळवडीच्या दिवशी दुपारी 3 च्या सुमारास धोबीघाट परिसरातून चालत जात होता. यावेळी दारूच्या नशेत त्याचा तोल जाऊन तो पडला आणि त्यात डोक्याला दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

निनाद करमरकर

| Edited By: सिद्धेश सावंत

Mar 20, 2022 | 3:43 PM

उल्हासनगर : धुळवडीच्या (Holi celebration) दिवशी उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar crime) आठ ते दहा जाणांकडून तीन तरुणांना मारहाण झाल्याचा प्रकार ताजा असतानाचा आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये धुळवडीच्या दिवशीच एकाची वीट डोक्यात घालून हत्या (Murder) करण्यात आली आहे. या प्रकारानं पुन्हा एकदा उल्हासनगर हादरुन गेलं आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांच्या आतच दोघा मारेकऱ्यांपैकी एकास अटक केली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकंही तैनात केली आहे. लवकरच दुसराही मारेकरी पोलिसांच्या हाती लागेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. किरकोळ कारणावरुन दोघांनी एका इसमाला मारहाण केली. या मारहाणीत इसमाच्या डोक्यात सिमेंटच्या विटेनं प्रहार करण्यात आला. यात इसमाच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं त्यातच त्याचा मृत्यू झाला.

सुरुवातीला या इसमाचा मृत्यू भलत्याच कोणत्यातरी कारणामुळे झाला असावा, असं तक्रारीत म्हटलं होतं. मात्र पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आपली तपास यंत्रणा कामाला लावली. त्यातून या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.

दारु पिऊन नाही, तर…

कुंदनमल दुलीचंद सुनगत असं हत्या झालेल्या 41 वर्षीय इसमाचं नाव आहे. म्हारळ गाव परिसरात वास्तव्याला असलेला कुंदनमल धुळवडीच्या दिवशी दुपारी 3 च्या सुमारास धोबीघाट परिसरातून चालत जात होता. यावेळी दारूच्या नशेत त्याचा तोल जाऊन तो पडला आणि त्यात डोक्याला दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

मात्र शवविच्छेदन अहवालात त्याला मारहाण झाल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी यानंतर अधिक माहिती घेतली. तेव्हा रुपराज उर्फ भाई राजा पाटील आणि निशान उर्फ बाळा हिरामण साठे या दोघांनी त्याला मारहाण करून सिमेंटच्या दगडाने त्याच्या तोंडावर मारल्याची उघडकीस आलं. त्यानुसार पोलिसांनी काही तासातच रुपराज उर्फ भाई राजा पाटील या मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या. तर बाळा साठे हा फरार आहे. सध्या पोलिस फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

हल्लेखोर रेकॉर्डवरील गुन्हेगार

हल्लेखोर रुपराज पाटील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला तडीपार सुद्धा करण्यात आलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिलीये. त्याला सध्या न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्याचा साथीदार बाळा साठे याला शोधण्यासाठी पोलिसांच्या तीन टीम रवाना झाल्याची माहिती उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली आहे. लवकरच फरार आरोपीही हाती लागले, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

सोलापुरातून अजय देवगणला अटक! अजय देवगण सुनके एक्टर समझे क्या? ऊसतोड कामगार कम दरोडेखोर है आपुन

अनैतिक संबंधास महिलेचा विरोध, प्रियकराने कटरने चिरला गळा, महिलेची प्रकृती चिंताजनक

तलवारीनं हल्ला करत 10 लाखांच्या खंडणी मागितली! 7 दिवसांच्या आता दोघा खंडणीखोरांच्या मुसक्या आवळल्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें