Crime : आठ ते दहा जणांकडून तीन तरुणांना मारहाण, उल्हासनगरमधील प्रकार, धुळवडीच्या वादातून मारहाणीची घटना

Crime : आठ ते दहा जणांकडून तीन तरुणांना मारहाण, उल्हासनगरमधील प्रकार, धुळवडीच्या वादातून मारहाणीची घटना
वार्ड प्रमुखाला अनेक महिने ओलीस ठेवल्याचा आमदारावर आरोप.
Image Credit source: tv9

उल्हासनगरच्या कॅम्प 4मधील ब्राह्मणपाडा परिसरात धुळवडीच्या दिवशी दुपारी 8 ते 10 जाणांनी तीन तरुणांना मारहाण केल्याची घटना घडलीय. या मारहाणीत एका तरुणाला जास्त मार लागला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांकडून अधिक तपास करत आहेत.

निनाद करमरकर

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 19, 2022 | 6:49 AM

ठाणे : उल्हासनगरच्या कॅम्प 4मधील ब्राह्मणपाडा परिसरात धुळवडीच्या दिवशी दुपारी 8 ते 10 जाणांनी तीन तरुणांना (youths) मारहाण केल्याची घटना घडलीय. या मारहाणीत (Beating) एका तरुणाला जास्त मार लागला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. अवधूत साळवे हा तरुण मित्रांसह धुळवड (Holi festival)साजरी करत असतानाच अचानक इतर काही तरुणांचा त्याच्याशी वाद झाला. यानंतर वाद वाढत गेला. या तरुणांच्या वादाच रुपांतर काही वेळात मारहाणीत झालं. त्यानंतर समोरील आठ ते दहा जणांनी मिळून अवधूत साळवे आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली. या मारहाणीत मंगल गुप्ता या तरुणाला जास्त मार लागल्याची माहिती आहे. मंगल गुप्ता याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर विष्णू वराडे आणि अवधूत साळवे हे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांकडून (Police) अधिक तपास करत आहेत.

धुळवडीच्या वादातून घटना

होळी आणि धुळवडीचा सण राज्यभरात उत्साहात साजरा झाला. पण, तुरळक ठिकाणी वादाच्या घटनाही घडल्याचं दिसून आलं. तसाच प्रकार उल्हासनगरात दिसून आला. उल्हासनगरच्या कॅम्प 4मधील ब्राह्मणपाडा या भागात धुळवडीत तरुणांमध्ये वाद झाला आणि तो वाढत गेल्यानं मारहाण झाली. दुपारी 8 ते 10 जाणांनी तीन तरुणांना मारहाण केल्याची घटना घडलीय आणि ती वाऱ्यासारखी पसरली. या मारहाणीत एका तरुणाला जास्त मार लागला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

वादाचे कारण काय?

धुळवड म्हटलं की तरुण मंडळी एकत्र येऊन मजा करतात. यात किरकोळ वादही होतात. ब्राह्मणपाडा परिसरात धुळवडीच्या दिवशीही किरकोळ वाद झाला. मात्र, या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. अवधूत साळवे हा तरुण मित्रांसह धुळवड साजरी करत असताना तेथे अचानक काही तरुणांचा त्याच्याशी वाद झाला. हा वाद त्यानंतर वाढतच गेला. या तरुणांच्या वादाच रुपांतर काही वेळात मारहाणीत झालं. त्यानंतर समोरील आठ ते दहा जणांनी मिळून अवधूत साळवे आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली. या मारहाणीत मंगल गुप्ता या तरुणाला जास्त मार लागल्याची माहिती आहे. आता या संपूर्ण प्रकाराचा तपास पोलीस करत आहेत.

पोलीसांकडून ठिकठिकाणी सतर्कता

राज्यात विविध ठिकाणी धुळवड साजरी होत असताना पोलिसांकडून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाद उद्भवू नये यासाठी विशेष पथकही तैनात करण्यात आले होते. मात्र, उल्हासनगरसारखी तुरळक ठिकाणी काही वादाच्या घटना समोर आल्यायेत. आता उल्हासनगरमधील प्रकाराचा पोलीस तपास करत आहेत.

इतर बातम्या

Housewife Investment tips : गृहिणींनो ‘अशी’ करा आपल्या बचतीच्या पैशांची गुंतवणूक; मिळेल चांगला परतावा

Aurangabad | टाटा पॉवरच्या सहकार्यातून औरंगाबादेत 50 चार्जिंग स्टेशन उभारणार, इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन मोहिम वेगात

Tourism | औरंगाबादेत आता QR Code Scan करताच पर्यटनस्थळांची माहिती मिळणार, पुरातत्त्व खात्याचा उपक्रम

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें