Aurangabad | टाटा पॉवरच्या सहकार्यातून औरंगाबादेत 50 चार्जिंग स्टेशन उभारणार, इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन मोहिम वेगात

Aurangabad | टाटा पॉवरच्या सहकार्यातून औरंगाबादेत 50 चार्जिंग स्टेशन उभारणार, इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन मोहिम वेगात
सांकेतिक छायाचित्र

शहरात सध्या मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या पुढाकारातून मिशन फॉर ग्रीन मोबिलिटी अभियान सुरु आहे. या अभियानाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांसाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले जात आहे.

मंजिरी धर्माधिकारी

|

Mar 19, 2022 | 6:00 AM

औरंगाबादः मिशन ग्रीन मोबिलिटी (Mission Green mobility) अंतर्गत शहरात पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. औरंगाबादमध्ये बडे उद्योजक आणि महापालिका प्रशासनातर्फे ई वाहन (Electric vehicle) खरेदीसाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे. या मिशन अंतर्गत शहरातील उद्योजकांच्या पुढाकारातून 250 इ वाहने खरेदी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात आसले. तसेच यापैकी 101 वाहने काही दिवसांपूर्वी नागरिकांमध्ये वितरितदेखील करण्यात आले. मात्र इ वाहनांसाठी शहरात मुबलक प्रमाणात ई चार्जिंग स्टेशन (charging station) उभारण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. या वाहानांसाठी टाटा पॉवरच्या सहकार्याने मनपाच्या जागेवर 50 चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. टाटा पॉवरसोबत मनपा अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. यात ई वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी टाटा पॉवरने 50 ई चार्जिंग स्टेशन उभारून देण्याची तयारी दर्शवली.

पुढे काय प्रक्रिया?

शहरात 50 चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याचे टाटा पॉवरच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे. त्यानुसार येत्या आठवड्यात शहरातील काही जागांचे सर्वेक्षण केले जाईल. महापालिकेच्या मोकळ्या जागांवर चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. सहा महिन्यात चार्जिंग स्टेशन उभारून नागरिकांसाठी मोफत सुविधा पुरवली जाईल. त्यासोबतच महापालिकेनेदेखील 200 चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरु केली आहे.

मिशन ग्रीन मोबिलिटीला वेग

शहरात सध्या मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या पुढाकारातून मिशन फॉर ग्रीन मोबिलिटी अभियान सुरु आहे. या अभियानाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांसाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले जात आहे. उद्योजकांच्या पुढाकारातून शहरात आतापर्यंत 300 चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांचे बुकिंग करण्यात आले आहे. आता येत्या 25 आणि 26 मार्च रोजी मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्ये तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात एकूण 30 स्टॉल्स असतील तसेच ई चार्जिंग स्टेशन कंपन्यांचाही समावेश असेल. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना इ चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.

इतर बातम्या-

Rang Panchami 2022 : देवी-देवतांच्या होळीचा दिवस म्हणजे रंगपंचमी, जाणून घ्या कधी आणि कुठे साजरी केली जाते

Numerology Pick Your Colour for Holi 2022 | आता अंकशास्त्रानुसार खेळा होळी, जाणून घ्या कोणता रंगाने होळी खेळणं ठरणार तुमच्यासाठी लकी


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें