AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rang Panchami 2022 : देवी-देवतांच्या होळीचा दिवस म्हणजे रंगपंचमी, जाणून घ्या कधी आणि कुठे साजरी केली जाते

दर वर्षी होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो (Rang Panchami). चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षच्या पंचमीला रंगपंचमी साजरी केली जाते.

Rang Panchami 2022 : देवी-देवतांच्या होळीचा दिवस म्हणजे रंगपंचमी, जाणून घ्या कधी आणि कुठे साजरी केली जाते
holi 2022
| Updated on: Mar 22, 2022 | 11:31 AM
Share

दर वर्षी होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो (Rang Panchami). चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षच्या पंचमीला रंगपंचमी साजरी केली जाते. त्यामुळे याला कृष्ण पंचमी देखील म्हणतात. या दिवशी राधा-कृष्ण आणि इतर देवी देवतांनाही गुलाल आणि रंग लावतात (Rang Panchami The Day Of Gods) रंगपंचमी विशेषकरुन मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये खेळली जाते. यावर्षी रंगपंचमी 2022 (Rang Panchami 2022) 22 मार्चला येत आहे.रंगपंचमीचा दिवस देवी-देवतांना समर्पित असतो. मान्यता आहे की या दिवशी देवी-देवता ओल्या रंगांनी होळी खेळतात. रंगपंचमीच्या दिवशी लोक रंग आणि गुलाल उडवतात. मान्यता आहे की, याने देवता प्रसन्न होतात आणि भाविकांना आशीर्वाद देतात. अशी देखील मान्यता आहे की या दिवशी हवेत उडणारा गुलाल तमोगुण आणि रजोगुणला समाप्त करतो आणि सतोगुणला वाढवते. यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

जन्मकुंडलीचे दोष दूर होतील मान्यता आहे की रंगपंचमीच्या दिवशी जर विधिवत देवाची पूजा केली तर त्याच्या कुंडलीतील सर्व मोठे दोष नष्ट होऊ शकतात. रंगपंचमी धनदायकही मानलं जातं, त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन केलं जातं. अनेक ठिकाणी या सणाला श्री पंचमीच्या नावानेही ओळखलं जातं. या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन करते वेळी त्यांना गुलाबाच्या फुलांचा हार, दोन वात असलेला दिवा आणि पांढऱ्या रंगाच्या मिठाईचं नैवेद्य दाखवावं. यानंतर त्यांच्याकडे घरावर कृपा ठेवण्यासाठी प्रार्थना करा.

महाराष्ट्रात रंगपंचमीची धूम महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळी बनवली जाते. खासकरुन मासेमारी करणाऱ्यांच्या वस्तीत या दिवशी होळी साजरी केली जाते. नाचणे-गाणे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही ठिकाणी माठ फोडण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं. मासेमारी करणारा समाजात हा दिवस लग्न ठरवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

या उपायांनी आर्थिक समस्या सुटेल 1. पूजेनंतर सूर्य देवाला अर्घ्य द्या. अर्घ्यदरम्यान जलमध्ये रोली, अक्षता आणि शहद नक्की टाका.

2. एका नारळावर कुंकू लावा आणि त्याला शंकराच्या मंदिरात जाऊन महादेवाला समर्पित करा.

3. तांब्याच्या कलशात पाणी घ्या, यामध्ये मसूरची डाळ घालून शिवलिंगवर जलाभिषेक करा.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.