AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापुरातून अजय देवगणला अटक! अजय देवगण सुनके एक्टर समझे क्या? ऊसतोड कामगार कम दरोडेखोर है आपुन

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी-दर्गनहळ्ळी गावातील हिरजे वस्तीवर दरोडा टाकून बाबुराव हिरजे या वृद्धाती हत्या करत, त्यांच्या घरातून 75 हजारांचा मुद्देमाल लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील आठपैकी सहा जणांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे ते सर्वजण ऊसतोड कामगार असून एकमेकांचे नातेवाईक आहेत.

सोलापुरातून अजय देवगणला अटक! अजय देवगण सुनके एक्टर समझे क्या? ऊसतोड कामगार कम दरोडेखोर है आपुन
सोलापूर पोलिसांकडून दरोड्यातील टोळी जेरबंद
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 3:46 PM

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी-दर्गनहळ्ळी गावात काही दिवसांपूर्वी झालेल्या सशस्त्र दरोड्या (Robbery)तील आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सोलापूर पोलिसांना यश आले आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखे (Crime Branch)ने त्या दरोड्यातील आरोपींच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलिस अधिक्षक तेजस्वी सातुपते यांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे या दरोड्यात एका वृध्दाची हत्या देखील करण्यात आली होती. त्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली होती. त्यानंतर दहा दिवसातच या दरोड्यातील आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. (Police succeed in arresting accused in Solapur robbery case)

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी-दर्गनहळ्ळी गावातील हिरजे वस्तीवर दरोडा टाकून बाबुराव हिरजे या वृद्धाती हत्या करत, त्यांच्या घरातून 75 हजारांचा मुद्देमाल लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील आठपैकी सहा जणांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे ते सर्वजण ऊसतोड कामगार असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी ज्या गावात दरोडा टाकला त्या दर्गनहळ्ळी शिवारात ऊसतोड केली होती. त्यावेळी गावातील शरणप्पा पाटील यांच्याशी आरोपींचे वाद झाले होते. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी त्यावेळीच शरणप्पा पाटील यांच्या घरावर दरोडा टाकण्याचे ठरविल्याची माहिती समोर आल्याचेही पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

हे आहेत अटकेतील दरोडेखोर

दर्गनहळ्ळी रोडवरील हिरजे यांच्या वस्तीवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा वैभव उर्फ भोरड्या एकनाथ काळे (रा. फकराबाद, जि. अहमदनगर) हा म्होरक्या आहे. अजय देवगण उर्फ देवगण सपा शिंदे, सुनिल उर्फ गुल्या सपा शिंदे (दोघेही रा. शेळगाव, ता. परांडा ), ज्ञानेश्व र लिंगु काळे (रा. पांढरेवाडी, ता. परांडा), विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम) हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. संतोष झोडगे (रा. डोकेवाडी, ता. भूम) हा त्यांना घेऊन आलेल्या गाडीचा चालक आहे. झोडगे याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर काळे आणि देवगण तसेच गुल्या या दोघांची पोलिस कोठडी सोमवारी संपणार आहे. त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. तर ज्ञानेश्वरर काळेची पोलिस कोठडी 24 मार्चपर्यंत असून विकास भोसले याला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान, अक्षय काळे रा. पिंपळगाव, ता. जामखेड आणि अनुज उर्फ नागनाथ भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम) या दोघांचा शोध सुरु आहे.

पहिला प्रयत्न फसल्यानंतर गाडी भाड्यासाठी ठरविला दुसरा प्लॅन

बोरामणी परिसरातील दर्गनहळ्ळी रोडवरील शरणप्पा पाटील यांच्या वस्तीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसल्यानंतर दरोडेखोर जवळच शेतात लपून बसले. गावकरी जागे झाल्याने आपण आता परत जाऊ असे काहींचे मत झाले. पण, दरोडेखोरांच्या म्होरक्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जायचे नाही. गाडी भाड्यासह आपला खर्च निघायला हवा म्हणून एक-दीड तासांनी पाटील वस्तीपासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावरील हिरजे यांच्या वस्तीवर दरोडा टाकला. दरोडेखोरांबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यानंतर पाटील यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार एका संशयिताचे स्केच तयार करून त्याचा शोध सुरु केला. त्यांनी मोबाइल बंद करून पुन्हा ऊसतोड करायला सुरवात केली होती. त्यांच्यार पाळत ठेवून टप्याटप्याने संशयित आरोपींना अटक करण्यात आली.

तपास पथकाला मिळणार मोठे बक्षीस

दरोडेखोरांना पकडण्यात यशस्वी झालेल्या पोलिसांच्या पथकाला प्रोत्साहनपर बक्षीस मिळावे म्हणून पोलिस महानिरीक्षक कार्यालयास प्रस्ताव पाठविला जाणार आहे. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे, सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे, सहायक पोलिस निरीक्षक सत्यजीत आवटे, अतुल भोसले, अंकुश माने, नागनाथ खुणे, प्रविण सपांगे, पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सुरज निंबाळकर, सहायक फौजदार खाजा मुजावर, राजेश गायकवाड, श्रीकांत गायकवाड, पोलिस हवालदार नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, बापू शिंदे, सलिम बागवान, आबा मुंडे, मोहन मनसावाले, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, पोलिस नाईक रवि माने, दया हेंबाडे, अमोल माने, लाला राठोड, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अजय वाघमारे, नितीन चव्हण, पांडुरंग काटे, सचिन गायकवाड, व्यंकटेश मोरे, अन्वर आतार, रतन जाधव, देवा सोनलकर, चालक प्रमोद माने, रामनाथ बोंबिलवार, केशव पवार, समीर शेख यांच्या पथकाने केली आहे.

असा घडला होता घटनेचा थरार

दर्गनहळ्ळी गावातील दोन कुटुंबावर दरोडेखोरांनी मध्यरात्री 1 च्या सुमारास सशस्त्र हल्ला केला होता. दर्गनहळ्ळी गावातील शरणप्पा पाटील यांची पत्नी कुत्रे भुंकण्याचा आवाज येत असल्याने घराबाहेर आल्या. कुत्रे ज्या दिशेने भुंकत होते तेथे बॅटरीद्वारे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना दोन धारदार सशस्त्र दरोडेखोर निदर्शनास आले. त्यानंतर त्या महिलेने गोंधळ घालायला सुरूवात केली. तेव्हा तिचे पती शरणप्पा पाटील यांनी दोन मुले, सून आणि पत्नीला घरात घेतले. त्यानंतर फोनवरून गावातील लोकांना बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नातेवाईक असलेले पुतण्या, भाऊ त्या ठिकाणी आले असता त्यांच्यावर दरोडेखोरांनी दगडफेकीला सुरूवात केली. नातेवाईक आल्यामुळे शरणप्पा पाटील पुन्हा घराबाहेर आले मात्र दोन दरोडेखोर दारातच असल्याने त्यांनी शरणप्पा पाटलांच्या दिशेने धाव घेतली. ते पाहताच शरणप्पा पाटील पुन्हा घरात घुसले आणि दरवाजा लावत असताना त्यांच्या हातावर दरोडेखोरांनी सत्तूरने हल्ला केला. या हल्ल्यात शरणप्पा पाटील यांच्या हातावर वार झाला आणि ते जखमी झाले. यामध्ये त्यांना पाच ते सहा टाके पडले. त्यानंतर गावातील तीस ते चाळीस लोकांचा जमाव आल्याने सर्व दरोडेखोरांनी पळ काढला.

बापू हिरजे यांच्या वस्तीवर दरोडा टाकला

पुढे जाऊन या दरोडेखोरांनी गावच्या वेशीपासून काही अंतरावर असलेल्या बापू हिरजे यांच्या वस्तीवर दरोडा टाकला. यावेळी हिरजे कुटुंबातील सोमा हिरजे हे द्राक्ष हंगाम सुरू असल्याने द्राक्षबागेत कामासाठी गेले होते तर त्यांचे वृद्ध आई-वडील घरीच होते. त्यावेळी हे दरोडेखोर गावापासून दूर असलेल्या हिरजे यांच्या घरात घुसले. त्यांनी वृद्ध दाम्पत्याकडे सोने आणि पैशाची मागणी केली. मात्र त्याला बापू हिरजे यांनी विरोध केला. त्यामुळे दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांना जखमी केले तर त्यांच्या पत्नी सुलोचना यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, सोन्याचे कानातले घेतले आणि त्यांचे हातपाय बांधून त्यांना डांबले. त्यानंतर दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. (Police succeed in arresting accused in Solapur robbery case)

इतर बातम्या

Yavatmal Crime | अनैतिक संबंधास महिलेचा विरोध, प्रियकराने कटरने चिरला गळा, महिलेची प्रकृती चिंताजनक

तलवारीनं हल्ला करत 10 लाखांच्या खंडणी मागितली! 7 दिवसांच्या आता दोघा खंडणीखोरांच्या मुसक्या आवळल्या

पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन.
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA.
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?.
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची...
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची....
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू.
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?.
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल.
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू.
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन.