AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी, अमेरिकेने केली भूमिका स्पष्ट, भारत रशियाकडूनच…

भारत आणि अमेरिकेतील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात होती. शेवटी अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केला. मात्र, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करू शकणार नाही असे सांगितले जात आहे. त्यावर आता भारताने आपली भूमिका स्पष्ट केली.

भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी, अमेरिकेने केली भूमिका स्पष्ट, भारत रशियाकडूनच...
India and America
| Updated on: Feb 16, 2026 | 9:36 AM
Share

भारत आणि अमेरिकेतील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात राहिले. अमेरिकेने भारतावर अत्यंत मोठा टॅरिफ लावला. त्यानंतर या टॅरिफनंतर होणारे नुकसान भरून काढण्यासाठी भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले. भारताने कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाकडून तेल खरेदी थांबवावी याकरिता भारतावर मोठा दबाव अमेरिकेचा होता. अचानक अमेरिकेने मोठी घोषणा करत जाहीर केले की, भारतावरील टॅरिफ कमी केला. 50 टक्के टॅरिफ कमी करून 18 टक्के करत आहोत. अमेरिकेने भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारताने 50 टक्के टॅरिफ लावला. त्यापैकी 25 टक्के दंडात्मक टॅरिफ लावण्यात आला. मात्र, यादरम्यान दावा करण्यात आला की, भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याने आम्ही भारतावरील टॅरिफ कमी केला. सध्या भारत आणि अमेरिकेत व्यापार करार पूर्ण झाले असून तांत्रिक बाबींवर काम सुरू आहे. मार्च महिन्यात या कराराबद्दल घोषणा केली जाईल.

अमेरिका आणि भारत व्यापार करारादरम्यान अनेक दावे केली जात आहेत. तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, या कराराच्या बदल्यात भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शविली आहे. म्हणजे आता भारत हा रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचे बोलले जात आहे. खरोखरच भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही का? हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे.

भारत रशियाकडून तेल खरेदी करणार की नाही? याबाबत आता मोठा खुलासा भारताकडून करण्यात आला. आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही या प्रकरणावर एक निवेदन जारी केले आहे. रुबियो यांनी स्पष्टपणे म्हटले की, अमेरिकेने भारताकडून अतिरिक्त रशियन तेल खरेदी थांबवण्याचे काम केले. रुबियो यांच्या बोलण्याचा अर्थ थोडक्यात असा की, भारत सध्या रशियाकडून जितके तेल खरेदी करतो, तितके तेल खरेदी करू शकतो.

फक्त भारताला रशियाकडून अतिरिक्त तेल खरेदी करण्यापासून रोखण्यात आले. भारताने स्पष्टपणे म्हटले की, भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अमेरिकेने सातत्याे दावा केला जात आहे की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. मात्र, भारतानेही म्हटले की, आमच्या देशातील नागरिकांना ऊर्जा स्वस्त मिळवण्याकरिता आम्ही कोणाकडूनही तेल खरेदी करू शकतो.

Follow Us
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान