धुळवड खेळणाऱ्यांची मजा, रिक्षातून जाणाऱ्यांना फुकटची सजा! पाण्यानं भरलेला फुगा रिक्षावर भिरकावला आणि…

धुळवड खेळणाऱ्यांची मजा, रिक्षातून जाणाऱ्यांना फुकटची सजा! पाण्यानं भरलेला फुगा रिक्षावर भिरकावला आणि...
पाण्याचा फुगा मारल्यानं रिक्षा पलटली!
Image Credit source: TV9 Marathi

Video : रिक्षावर फुगा बसताक्षणी रिक्षा एका बाजूला कलंडते. आडवी होते. प्रवासी रिक्षातच अडकलेले दिसून आलं आहे. यानंतर रिक्षावर पाण्यानं भरलेले फुगे भिरकावणारे पळ काढतात.

सिद्धेश सावंत

|

Mar 20, 2022 | 4:47 PM

उत्तर प्रदेश : धुळवडीला (Holi Celebration) एकमेकांना भिजवण्यासाठी लोकं एक एक करामती करत असतातच. पिचकाऱ्या, पाण्याने भरलेले फुगे, पिशव्या, रंग हे तर नेहमीचं ठरलेलं आहेच. मात्र एकमेकांना भिजवण्याच्या, रंग लावण्याच्या नादात मस्करीची कुस्करी होणार नाही, याचं भानही प्रत्येकानं ठेवायला हवं. ते ठेवलं गेलं नाही, की मग नको ते प्रसंग घडतात. यातले काही प्रसंग तर कधी-कधी जीवावर बेतणारेही ठरु शकतात, हे अधोरेखित करणारी घटना समोर आली आहे. धुळवडीचा अतिउत्साह जीवावर बेतणारा एक धक्कादायक व्हिडीओ (Viral video) उत्तर प्रदेशातून समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. पाण्यानं भरलेला एक फुगा रिक्षावर (Auto Rikshaw) भिरकावल्यामुळे एक रिक्षा उलटली. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी रिक्षा ही प्रवाशांनी भरलेली होती.

मस्करीची कुस्करी…

उत्तर प्रदेशच्या कोतवाली बागपतमधील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वायरल व्हिडीओनंतर पोलिसांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या व्हिडीओत धुळवडीची मजा एकीकडे सुरु असताना त्याची सजा मात्र रिक्षातील प्रवाशांना झाली असल्याचं दिसून आलंय.

काय दिसलं व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये हायवे दिसतोय. हायवेवर एकही वाहन नाहीये. काही मुलं धुळवड खेळण्यात दंग आहेत. इतक्यात एका भरधाव वेगानं येणाऱ्या रिक्षावर काही मुलं पाण्यानं भरलेले फुगे भिरकावतात. रिक्षाचा वेग प्रचंड असतो. रिक्षा प्रवाशांनी भरलेली असते.

रिक्षावर फुगा बसताक्षणी रिक्षा एका बाजूला कलंडते. आडवी होते. प्रवासी रिक्षातच अडकलेले दिसून आलं आहे. यानंतर रिक्षावर पाण्यानं भरलेले फुगे भिरकावणारे पळ काढतात. रिक्षा एका बाजूला पूर्णपणे आडवी होते. या घटनेत रिक्षातील दोघा प्रवाशांनी किरकोळ मार लागला असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी या व्हायरल व्हिडीओची गंभीर दखल घेत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. रिक्षावर फुगे फेकल्यानं प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलंय. यामुळे रिक्षा उलटून प्रवाशांना जीव धोक्यात घालणाऱ्यांवर आता काय कारवाई होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Ulhasnagar मध्ये धुळवडीच्या दिवशी हत्याकांड! दारु पिऊन पडून नव्हे, तर डोक्यात वीट घालून हत्या

तलवारीनं हल्ला करत 10 लाखांच्या खंडणी मागितली! 7 दिवसांच्या आता दोघा खंडणीखोरांच्या मुसक्या आवळल्या

लिव्ह इनचं झिंगाट, रस्त्यावर गोंगाट, पोट्टं टाईट, पोरीसोबत भररस्त्यात फाईट

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें