Live In Video: लिव्ह इनचं झिंगाट, रस्त्यावर गोंगाट, पोट्टं टाईट, पोरीसोबत भररस्त्यात फाईट

Live In Video: लिव्ह इनचं झिंगाट, रस्त्यावर गोंगाट, पोट्टं टाईट, पोरीसोबत भररस्त्यात फाईट
लखनऊमधील लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुण-तरुणीचा व्हायरल व्हिडीओ.
Image Credit source: tv9

लखनऊमध्ये मध्ये शनिवारी रात्रीपासून एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुण-तरुणीमध्ये वाद झाल्याचं दिसून येतंय. तरुण तरुणीला तिचे केस धरुन रस्त्याच्या मधोमध उभा राहून मारहाण करतोय. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 20, 2022 | 1:37 PM

लखनऊ :  लखनऊमध्ये मध्ये शनिवारी रात्रीपासून एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live in relationship) राहणाऱ्या तरुण-तरुणीमध्ये (couple)वाद झाल्याचं दिसून येतंय. तरुण तरुणीला तिचे केस धरुन रस्त्याच्या मधोमध उभा राहून मारहाण करतोय. ज्यामध्ये तरुणी स्वतःला वाचवण्याची विनंती रस्त्यावरील लोकांना करत आहे. त्याचवेळी आजूबाजूचे उभे असलेले लोक आणि रस्त्यावरून जाणारे लोक हा तमाशा बघताना दिसतायेत. व्हिडिओच्या (viral video) आधारे पोलिसांनी दोघांची माहिती मिळवली असून दोघांनाही पोलिस ठाण्यात आणल्याचं समजतंय. आता याप्रकरणात तरुणावर कोणतीही कारवाई होणार नाहीस, असं सागून तरुणी निघून गेली आहे. दुसरीकडे गोमतीनगर विस्तार पोलीस स्टेशनने प्रकरणाचे गांभीर्य दखल घेऊन तरुणावर कारवाई करताना त्याला ताब्यात घेतलं आहे. हा तरुण तरुणीचा झिंगाट चांगलाच व्हायरल होतोय.

भाऊ मला वाचवा!

भाऊ कुणीतर मला वाचवा, काकू प्लीज मला वाचवा, असे ती तरुणी रस्त्यावर ओरडत राहिली. पण यावेळी उपस्थित असलेल्या कुणीही तिच्याकडे लक्ष देत नसून तमाशा पाहत असल्याचे दिसून येत आहे. तर तरुण केस पकडून तिला मारहाण करतोय आहे. रस्त्यावर हा तमाशा चालू असताना एका महिलेने हिंमत दाखवून तरुणाला अडवल्यानंतर सुरुवातीला तिने मुलीला सोडवलं. पण पुन्हा तिच्या मोबाईलसाठी तिला मारहाण करण्यास तरुणाने सुरुवात केली. हा व्हिडीओ 1.28 मिनिटांचा असून शनिवारी रात्री चांगलाच व्हायरल झालाय.

दोघेही लिव्ह-इन-रिलेशनमध्ये

गोमतीनगरमधील पोलीस अधिकारी दिलीप कुमार सिंह यांनी सांगितलं की, शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये एक तरुण मुलीला केसांनी ओढत आहे. मुलगी बचावासाठी याचना करत होती. तपासात हा व्हिडिओ पोलीस ठाणे हद्दीतील रामसरे नगर येथील असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले आणि पीडित तरुण आणि पीडित तरुणीला पोलीस ठाण्यात आणलं. दोघेही खासगी नोकरी करतात, असे तरुणीने सांगितले आहे. चार वर्षांपूर्वी दोघांची मैत्री झाली. त्यानंतर दोघे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. शनिवारी मोबाईलवरून वाद झाला. मात्र, या तरुणीला कोणतीची तक्रार नोंदवायचा नाही. यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी तरुण परमदीप सिंग याला शांतता भंग केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. मुलगी सीतापूरची रहिवासी आहे. पंजाबमधील रहिवासी इंद्रमोहन यांचा मुलगा परमदीप याच्याबाबत इतर माहिती गोळा केली जात आहे. पण हा लिव्ह इनचा झिंगाट चांगलाच व्हायरल झाला आहे.

इतर बातम्या

The Kashmir Files समोर Akshay Kumarचीही जादू चालेना; जाणून घ्या ‘बच्चन पांडे’ची कमाई

शिकार करायची विसरला की काय वाघ? Viral झालेला Photo पाहून लोक बुचकळ्यात!

Video : भाजपचं हिंदुत्व केवळ राजकारणासाठी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें