Crime | सोलापुरात  सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेने उचलेले टोकाचे पाऊल

Crime | सोलापुरात  सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेने उचलेले टोकाचे पाऊल
विवाहितेची विहीरीत उडी मारुन आत्महत्या
Image Credit source: TV9

विवाहानंतर काही दिवसातच पती व सासरा यांनी विवाहीतेला माहेरी जाऊ नये , माहेरच्या लोकांशी संपर्क करु नये, यासाठी शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. सासरच्या लोकांकडून सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून स्वाती हिने टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपवले आहे.

सागर सुरवसे

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Mar 20, 2022 | 4:24 PM

सोलापूर – सासरच्या त्रासाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. माढा (Madha) तालुक्यातील कुर्डूगावात हे घटना घडली आहे. स्वाती श्रीकांत पाटील (वय 22 )असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती श्रीकांत पाटील व सासरे पाटील या दोघा विरोधात कुर्डूवाडी पोलिस(Kurduwadi Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेने कुर्डू गावातील राजाभाऊ पाटील यांच्या विहीरीत उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या विवाहाला अवघे 22 महिनेत झाले, तोपर्यंतचही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशी घडली घटना

माढामधील कुर्डू गावातील श्रीकांत पाटील यांच्यासोबत मृत स्वातीहीच पावणे दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसातच पती व सासरा यांनी विवाहीतेला माहेरी जाऊ नये , माहेरच्या लोकांशी संपर्क करु नये, यासाठी शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. सासरच्या लोकांकडून सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून स्वाती हिने टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपवले आहे. आत्महत्येची घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सासरच्यांचा विरोधात बाबासाहेब भालचंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत मयत विवाहीतेचे पती श्रीकांत राजाभाऊ पाटील व सासरे राजाभाऊ पाटील रा.कुर्डू यांच्या विरोधात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे व सहा.पो.निरीक्षक विक्रांत बोधे यांनी भेट दिली.सदर आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक किरण भालेकर हे करीत आहेत.

2 वर्षात तब्बल 38 Flatsची खरेदी! यशवंत जाधवांनी कधी काय घेतलं? 2 वर्षांची कुंडली tv9च्या हाती

प्राजक्ता माळीचा निळ्या साडीतला लूक!

Ulhasnagar मध्ये धुळवडीच्या दिवशी हत्याकांड! दारु पिऊन पडून नव्हे, तर डोक्यात वीट घालून हत्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें