2 वर्षात तब्बल 38 Flatsची खरेदी! यशवंत जाधवांनी कधी काय घेतलं? 2 वर्षांची कुंडली tv9च्या हाती

2 वर्षात तब्बल 38 Flatsची खरेदी! यशवंत जाधवांनी कधी काय घेतलं? 2 वर्षांची कुंडली tv9च्या हाती
वाचा, कधी कुठे काय खरेदी केली?
Image Credit source: TV9 Marathi

Yashwant Jadhav Property details: केंद्रीय तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत सुमारे 38 मालमत्तांची खरेदी केलेली आहे.

राहुल झोरी

| Edited By: सिद्धेश सावंत

Mar 20, 2022 | 4:15 PM

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत पालिका (Richest municipality in India) म्हणून बीएमसी (BMC) ओळखली जाते. या पालिकेचा स्थायी समिती अध्यक्षांची श्रीमंती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची केवळ दोन वर्षात तब्बल 38 फ्लॅट आणि ऑफिस मालमत्तांची खरेदी (Yashwant Jadhav Property purchase) केल्याचं समोर आलं आहे. स्थायी समिती अध्यक्ष झाल्यापासून जाधवांच्या संपत्तीत घसघशीत वाढ झाली असल्याचे आरोप केले जात होते. अशातच मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केवळ दोन वर्षात तब्बल 38 ठिकाणी वेगवेगळ्या प्रॅापर्टी खरेदी केल्याचा धक्कादायक अहवाल टीव्ही 9 मराठीच्या हाती लागलाय. यशवंत जाधव आणि त्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अगरवाल यांनी मुंबईत सुमारे 38 मालमत्तांची खरेदी केलेली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत सुमारे 38 मालमत्तांची खरेदी केलेली आहे. केवळ दोन वर्षांत हे सर्व आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोणत्या वर्षात किती खरेदी?

 1. 2020 – 07
 2. 2021 – 24

कोणत्या महिन्यात किती खरेदी ?

 1. मार्च 2020 – 1
 2. डिसेंबर 2020 – 2
 3. जानेवारी 2021 – 3
 4. फेब्रुवारी 2021 – 2
 5. मार्च 2021 – 5
 6. मे 2021 – 1
 7. जून 2021 – 2
 8. जुलै 2021 – 6
 9. ऑगस्ट 2021 – 2
 10. डिसेंबर 2021 – 3

यशवंत जाधवांकडे कुठे किती घबाड मिळालं, त्याची सविस्तर माहिती –

 1. वॉटर फिल्ड 5 कोटी 10 लाख
 2. क्रॉस रोड IV, वांद्रे, बिलखाडी चेंबर्स 2 कोटी
 3. वाडी बंदर, माझगाव 1 कोटी 60 लाख
 4. भायखळा – व्हिक्टोरीया गार्डन 2 कोटी 20 लाख
 5. लोणावळ्यात 2 दोन ट्विन्स बंगले
 6. हॅाटेल्स, ॲाफिस अशा कमर्शिअल प्रॅापर्टीज सोबत अनेक रहिवासी बिल्डिंगमध्ये यशवंत जाधव यांचे फ्लॅट
 7. मुंबई माझगाव परिसरात गोडाऊन
 8. दापोलीत समुद्रकिनारी मोठी जागा
 9. मरिन ड्राईव्ह आणि कुलाबा परिसरातही कोट्यवधी रुपयांची खरेदी

संबंधित बातम्या :

काही चुकांमुळे Congress कमकुवत झालीय, सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला

Devendra Fadnavis : मी ठरवलं की नंबर 1 येतोच, फडणवीसांचं पुन्हा आघाडीला आव्हान, 3 मार्कशीट जूळवून पहिले आल्याचाही टोला

Ulhasnagar मध्ये धुळवडीच्या दिवशी हत्याकांड! दारु पिऊन पडून नव्हे, तर डोक्यात वीट घालून हत्या

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें