Pune Crime | बलात्काराच्या घटनेने पुणे हादरले; अल्पवयीन मुलीवर वडील व भावानेच केला …

Pune Crime | बलात्काराच्या घटनेने पुणे हादरले; अल्पवयीन मुलीवर वडील व भावानेच केला ...
मघ्य प्रदेशात दोन समाजात तुफान हाणामारी.
Image Credit source: social

धक्कादायकबाब म्हणजे वडील व भावानेच मुलीवर बलात्कार केला आहे. एवढंच नव्हेतर मामांकडूनही झालेत मुलीवर लैंगिक अत्याचार झाले आहेत. याप्रकरणी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश बोरसे

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Mar 19, 2022 | 12:00 PM

पुणे – मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने पुणे(pune )  हादरले आहे. दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची घटना ताजी असताना आज आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे . शहरात एका अल्पवयीन मुलीवर (Minor girls)बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.धक्कादायकबाब म्हणजे वडील व भावानेच मुलीवर बलात्कार केला आहे. एवढंच नव्हेतर मामांकडूनही झालेत मुलीवर लैंगिक अत्याचार झाले आहेत. याप्रकरणी बंड गार्डन पोलीस (BundGarden Police)स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी मूळची बिहारची असून पुण्यात शिक्षणासाठी आली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

चिमुकलीवर अत्याचार

दुसरीकडे काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड येथील दिघी परिसरात मजूर महिलेच्या दोन वर्षीय चिमुरडीवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. आरोपीने पीडित मुलीला बिस्किट खायला देतो म्हणून घेऊन गेला. अन लष्कर परिसरातील जंगलात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर याबबात घरी काहीही सांगू नये म्हणून मुलीला धमकी देता तिला मारहाण ही केली. त्यानंतर घरी आल्यानंतर मुलीचा व चेहरा सुजलेला दिसला तसेच तिच्या वर्तनात ही बदल झाल्याचा आढळून आला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने तिला गोडेबोलून विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने पोलीस स्थानकात दहा घेऊन फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना पोलीस प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनत चालला आहे.

सून विहिरीत पाय घसरुन पडल्याचा बनाव उघड, पती-जावा-सासू-सासऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा

Photo Gallery: इगतपुरीमध्ये 2 एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याच्या काळजाचे पाणी-पाणी!

Dance video आवडत असतील तर या चिमुकलीचं कौशल्य पाहा, कसा धरलाय ठेका…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें