Dance video आवडत असतील तर या चिमुकलीचं कौशल्य पाहा, कसा धरलाय ठेका…

Dance video आवडत असतील तर या चिमुकलीचं कौशल्य पाहा, कसा धरलाय ठेका...
चिमुरडीचा अप्रतिम डान्स व्हिडिओ झाला व्हायरल
Image Credit source: Twitter

Girl cute video : हल्लीची मुले (Kids) ही केवळ म्हणायला लहान आहेत, त्यांच्यात अप्रतिम प्रतिभा पाहायला मिळत आहे. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगी डान्स करताना दिसत आहे.

प्रदीप गरड

|

Mar 19, 2022 | 11:44 AM

Girl cute video : हल्लीची मुले (Kids) ही केवळ म्हणायला लहान आहेत, त्यांच्यात अप्रतिम प्रतिभा पाहायला मिळत आहे. मग ते गाणे असो वा नृत्य, स्टंट करणे किंवा असे कोणतेही काम, जे अनेकदा मोठे करताना दिसतात, आता लहान मुलेही अशा कामांमध्ये मागे नाहीत. विशेषत: गायन किंवा नृत्यात आजकालच्या मुलांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. एक काळ असा होता की 3-4 वर्षांच्या मुलांना नीट चालता किंवा बोलताही येत नसे, पण आजकालची मुले या वयात गाताना किंवा नाचताना दिसतात. सोशल मीडियावर असे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये लहान मुले अप्रतिम नृत्य किंवा गाणे गाताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगी डान्स करताना दिसत आहे. तिचे वय अवघे 3-4 वर्षांचे असावे असे दिसते.

ती गाणे आठवत असावी…

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की मुलगी किती लहान आहे आणि मस्त डान्स करत आहे. मागे एक गाणे वाजत आहे आणि ती त्यावर ठेका धरत आहे. तिने एका हाताने काहीतरी पकडले आहे, जेणेकरून ते पडू नये. मात्र, नंतर ती दोन्ही हातांनी टाळ्या वाजवून नाचू लागते. तिचे हावभाव बघून ती गाणे आठवत असावी, असे वाटते. ती बहुधा टीव्ही पाहत आहे आणि त्यात कलाकार जसे नाचत आहेत, मुलगीही तसाच प्रयत्न करत आहे. मुलीचा हा डान्स खूपच मजेशीर आहे, जो पाहून तुम्हीही हसून हसाल.

ट्विटरवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @LovePower_page नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 50 सेकंदांच्या या व्हिडिओला लोक पसंत करत आहेत. लहान मुले खूप निरागस असतात आणि ते जे काही करतात ते अगदी निरागसपणे करतात. मुलीने अतिशय निरागसपणे डान्स केला आहे, पण तिची स्टाइल खूपच अप्रतिम आहे. ती पाहण्यासारखी आहे.

आणखी वाचा :

Viral होत असलेला Balloon Prankचा ‘हा’ Video पाहिला का? हसून हसून पोट दुखेल

Amazing Art : कलाकारानं साकारली अप्रतिम 3D रांगोळी; तुम्हीही म्हणाल, वाह, क्या टॅलेंट है!

…आणि अशाप्रकारे कावळ्यानं वाचवला उंदराचा जीव! लोक म्हणतायत, मैत्री असावी तर अशी…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें