Kids Video : ‘हा’ चिमुरडा शिडीवरून असा काही उतरतो… यूझर्स म्हणतायत, याला ऑलिम्पिकच्या तयारीला पाठवा

Kids Video : 'हा' चिमुरडा शिडीवरून असा काही उतरतो... यूझर्स म्हणतायत, याला ऑलिम्पिकच्या तयारीला पाठवा
शिडीवरून उतरताना चिमुरडा

सोशल मीडियावर मुलांशी संबंधित असे वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. व्हायरल व्हिडिओ(Viral Video)मध्‍ये मूल (Child) ज्या पद्धतीने पायऱ्यांवरून खाली उतरते ते पाहिल्‍यावर कदाचित तुम्‍हीही म्हणाल, याला ऑलिम्पिकला पाठवण्‍याची तयारी करायला हवी.

प्रदीप गरड

|

Jan 28, 2022 | 11:42 AM

Little child video : मुलं ही देवाघरची फूलं, ही म्हण तुम्ही सर्वांनी ऐकली असेल. सोशल मीडियावर मुलांशी संबंधित असे वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील, ज्यामध्ये त्यांचा निरागसपणा दिसला असेल. मुलांचा हा स्वभाव लोकांच्या मनाला भिडतो. मात्र, काही वेळा त्यांचा खोडकरपणाही लोकांना आवडतो. सध्या एका मुलाचा असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की इतक्या लहान मुलाने हे कसे केले? लहान मुलांचे खोडकर आणि निरागस स्टाइल असलेले अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण समोर आलेला हा व्हिडिओ पूर्णपणे वेगळा आहे. सहसा, ज्या वयात मुलांना अंथरुणातून नीट उतरता येत नाही, त्या वयात एखादा मुलगा स्पायडर मॅन (Spider Man) असल्याप्रमाणे पायऱ्या उतरत असतो. व्हायरल व्हिडिओ(Viral Video)मध्‍ये मूल (Child) ज्या पद्धतीने पायऱ्यांवरून खाली उतरते ते पाहिल्‍यावर कदाचित तुम्‍हीही म्हणाल, याला ऑलिम्पिकला पाठवण्‍याची तयारी करायला हवी.

आईही आहे जवळच

एवढ्या लहान मुलाचा हा पराक्रम पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मूल अप्रतिमपणे पायऱ्यांवरून खाली येत आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तिची आईही तिथे उभी आहे, पण आपले मूल जिन्यावरून पडेल याची तिला अजिबात चिंता नाही. काहींना हे पाहून गंमत वाटेल, पण मुलांबाबत अशा प्रकारे बेफिकीर राहणे योग्य नाही.

इन्स्टाग्रामवर शेअर

मुलाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत करत आहे. अवघ्या काही तासांपूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला 90 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे. त्याचवेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक त्यावर सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी पालकांना सल्ला दिला आहे, तर काहींनी व्हिडिओवर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘स्पायडरमॅन आल्यासारखे वाटते’

एका यूझरने सल्ला देत लिहिलं आहे, की बघायला गंमत वाटली, पण मूल पडलं तर काय… सोशल मीडियावर ते कसे व्हायरल होते याकडे लक्ष देण्याऐवजी पालकांनी अधिक जबाबदार असले पाहिजे. आणखी एका यूझरने लिहिले आहे ‘शाबास, मेरे वीर जवान.’ दुसर्‍या यूझरने कमेंट करत लिहिले, ‘चित्रपट पाहून स्पायडरमॅन आल्यासारखे वाटते.’ एकूणच हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.

So impressive! बास्केटबॉलचं कौशल्य दाखवून डॉगीनं जिंकलं सोशल मीडिया यूझर्सचं मन, पाहा Video

वधूच्या प्रवेशापूर्वीच रडू येईल, वरानं आधीच केली होती भविष्यवाणी; काय घडलं पुढे? पाहा Viral Video

Video : …हा तर दुकानदाराचाही बाप निघाला! काय घडलं पाहा; मग म्हणाल, शेवटी ग्राहकच असतो राजा..!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें