Viral होत असलेला Balloon Prankचा ‘हा’ Video पाहिला का? हसून हसून पोट दुखेल

Viral होत असलेला Balloon Prankचा 'हा' Video पाहिला का? हसून हसून पोट दुखेल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले बलून प्रँक
Image Credit source: Youtube

Balloon Prank : विनोदी (Comedy) व्हिडिओ म्हणजे सोशल मीडियावरचे (Social media) सर्वात जास्त चालणारे व्हिडिओ. सोशल मीडियावर प्रँकचे व्हिडिओदेखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. आता एक असाच प्रँक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो अत्यंत विनोदी आहे.

प्रदीप गरड

|

Mar 19, 2022 | 8:30 AM

Balloon Prank : विनोदी (Comedy) व्हिडिओ म्हणजे सोशल मीडियावरचे (Social media) सर्वात जास्त चालणारे व्हिडिओ. हे व्हिडिओ सर्वाच जास्त आणि वेगात व्हायरल (Viral) होत असतात. सोशल मीडियावर प्रँकचे व्हिडिओदेखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. एखादा विषय घेऊन त्यावर तो व्हिडिओ बनवला जातो. व्हिडिओ पाहत असताना आपल्याला वाटते, हे खरोखरच घडते आहे की काय? पण तो एक प्रँक असतो. म्हणजेच व्हिडिओतून दिशाभूल केली जाते. मात्र हे व्हिडिओ खूप विनोदी असल्याने यूझर्सना ते फार आवडतात. काही प्रँक भीतीदायक असतात. अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका माणसाचे शीर आणि धड वेगळे दिसत होते. त्याला पाहून माणसे घाबरत होती. आता एक असाच प्रँक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो अत्यंत विनोदी आहे.

…आणि पळून जातो

व्हिडिओमध्ये एक तरूण आणि एक तरुणी दिसत आहेत. तर थोड्या अंतरावर एक व्यक्ती आपल्या मोबाइलवर बोलत असल्याचे दिसत आहे. हे दोघे रस्त्याच्या कडेला फूटपाथवर एका मोठ्या झाडाखाली ते उभे असतात. तरुणीच्या हातात फुगे असतात. तरुणी झाडाच्या आड असते, तर तरूण झाडापासून थोडा दूर होतो. मग तरुणी एक फुगा मोठ्याने फोडते आणि तरूण जागेवरच कोसळतो. हे पाहून मोबाइलवर बोलणाऱ्याची भीतीने गाळण होते आणि तो तिथून पळून जातो.

यूट्यूबवर अपलोड

हा विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे. यूट्यूबवर imkavy या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. ‘Balloon Prank’ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे. 15 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला व्ह्यूजही चांगले मिळत आहेत. जवळपास 4.1 मिलियन एवढे व्ह्यूज मिळाले आहेत. इमोजी पोस्ट करून लोक हसत आहेत.

आणखी वाचा :

…आणि अशाप्रकारे कावळ्यानं वाचवला उंदराचा जीव! लोक म्हणतायत, मैत्री असावी तर अशी…

‘शांतपणे उभा होता ना बैल, काठीनं मारण्याची काय गरज होती?’ कसा शिकवला आजोबांना धडा? पाहा Viral video

मगरीला मिठी मारल्यानंतर लोक म्हणतायत, माणसाने अशा क्रूर प्राण्यांपासून दूर राहायला हवे! Video viral

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें