AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मगरीला मिठी मारल्यानंतर लोक म्हणतायत, माणसाने अशा क्रूर प्राण्यांपासून दूर राहायला हवे! Video viral

Crocodile video : क व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका मोठ्या मगरीला ज्या प्रकारे मिठी मारताना दिसत आहे, ते पाहिल्यानंतर कोणालाही भीती वाटेल.

मगरीला मिठी मारल्यानंतर लोक म्हणतायत, माणसाने अशा क्रूर प्राण्यांपासून दूर राहायला हवे! Video viral
माणसानं मारली मगरीला मिठीImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 18, 2022 | 12:04 PM
Share

Crocodile video : मगर किती क्रूर (Cruel) आणि भीतीदायक असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. जर कोणी तिच्या शक्तिशाली जबड्याच्या पकडीत आले तर त्याचे कार्य होईल, हे न सांगणेच योग्य… ती व्यक्तीचे शरीर आपल्या जबड्यात पकडून त्याला फाडू शकते. त्यामुळे पाण्यात राहून मगरीचा द्वेष करू नये, असे म्हणतात. पण आजकाल असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका मोठ्या मगरीला ज्या प्रकारे मिठी मारताना दिसत आहे, ते पाहिल्यानंतर कोणालाही भीती वाटेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्याने हा व्हिडिओ पाहिला तो विचारच करत राहिला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस मगरीसोबत जमिनीवर पडलेला दिसत आहे. हे दृश्य खरोखरच अजब आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर

अशा जंगली आणि क्रूर प्राण्यांना पाहिल्यानंतर इतर कोणत्याही प्राण्यांची भीतीने गाळण उडते. तिथे हा माणूस आरामात न घाबरता मगरीला मिठी मारताना दिसतो. त्या व्यक्तीकडे पाहून असे म्हणता येईल, की तो या मगरीला अजिबात घाबरत नाही. मगर आणि एका व्यक्तीचा हा आश्चर्यकारक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर jayprehistoricpets नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की जेव्हा डार्थ गेटरला बिग बॉय व्हायचे आहे आणि त्याला खेळायचे आहे. तुम्हाला माहिती आहे का, की कॅलिफोर्नियामधील डार्थ ही गॅटरची अतिशय आक्रमक प्रजाती आहे. पाळीव प्राणी म्हणून ठेवणे बेकायदेशीर आहे.

आश्चर्याचा धक्का

हा व्हिडिओ खूप लाइक केला जात आहे तसेच लोकांना आश्चर्याचा धक्काही देत आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला 75 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. याशिवाय अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

माणसाने दूर राहावे

एका यूझरने टिप्पणी करताना, आश्चर्य वाटते की डार्थ इतका गोंडस दिसत आहे. त्याचवेळी काही यूझर्स कमेंट करत असताना हा पाळीव प्राणी आहे का असा सवाल करत आहेत. दुसरीकडे, जर ती आक्रमक प्रजाती असेल तर माणसांनी त्यापासून दूर राहिले पाहिजे. त्याचवेळी आणखी एका यूझरने कमेंट करताना लिहिले आहे, की ते निर्दयी आहेत, त्यांच्यापासून दूर राहा. एकूणच, आश्चर्य वाटण्याव्यतिरिक्त लोक त्याचा आनंद घेत आहेत.

आणखी वाचा :

प्रेमाला कोणतंही बंधन नसतं, हेच खरं! आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी किती अतूर झाला हत्ती? पाहा Viral video

छोट्याशा बिबट्याची डरकाळी ऐकली का? Cute video होतोय Viral

…अन् अचानक E-rickshaw चालायला लागली! लोक म्हणतायत, हा तर ‘Mister India’चा डिलीट केलेला सीन..!

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.