तलवारीचा धाक दाखवत गुंडांची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, कुठं घडली घटना?

याच तरुणांनी काही ठिकाणी गाड्यांचीही तोडफोड केलीय. बारामती एमआयडीसीतील एका हॉटेलमधील राड्याचे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले आहे.

तलवारीचा धाक दाखवत गुंडांची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, कुठं घडली घटना?
नैराश्येतून महिलेने मुलासह जीवन संपवले
| Edited By: | Updated on: Dec 17, 2022 | 11:44 PM

पुणे : बारामती (Baramati) शहरासह एमआयडीसी परिसरात अज्ञात गुंडांनी तलवारी दाखवत दहशत माजवल्याचा प्रकार घडला आहे. बारामती शहरातील सराफ पेट्रोलपंप, टीसी कॉलेज आणि एमआयडीसीत (MIDC) तीन ते चार ठिकाणी तलवारीचा धाक दाखवून तोडफोड केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये (Citizens) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बारामतीत आज सायंकाळच्या सुमारास अज्ञात गुंडांनी तलवारीचा धाक दाखवत दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे. बारामती शहरातील सराफ पेट्रोलपंप, टीसी कॉलेज आणि एमआयडीसी परिसरात तलवारीचा धाक दाखवत तोडफोड केल्याची माहिती आहे.

दुचाकीवरून आलेल्या या गुंडांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तलवारीचा धाक दाखवत तोडफोड करण्यात आली. पाटस रस्त्यावर एकावर वार केल्याची माहिती मिळत आहे.

याच तरुणांनी काही ठिकाणी गाड्यांचीही तोडफोड केलीय. बारामती एमआयडीसीतील एका हॉटेलमधील राड्याचे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले आहे.

या घटनेमुळं परिसरात दहशत पसरली आहे. या गुंडांना आवर केव्हा घालणार, असा प्रश्न विचारला जात आहे. या गुंडांनी तलवारीचा धाक दाखविला. त्यामुळं नागरिक घाबरले आहेत. आता आरोपी शोधून त्यांना जेरबंद करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

तोडफोड करणारे तसेच दहशत पसरविणारे कोण आहेत. याचा शोध घेतला जात आहे. पण, यांनी असं का केलं, असा प्रश्न निर्माण होत आहे. दहशत पसरविणं आणि गुंड असल्याचं सांगणं, स्वतःच वर्चस्व प्रस्तापित करणं, असा काही उद्देश राहू शकतो.