दुदैवी! कार चालवताना ‘ब्रेक’ ऐवजी ‘ॲक्सिलेटर’ दाबला.. अन कार थेट विहिरीत कोसळली ; चालक महिलेचा मृत्यू

| Updated on: Dec 14, 2021 | 4:47 PM

पती दीपक यांनी वर्षां यांना ब्रेक दाबायला सांगितले मात्र वर्षा यांनी ब्रेक न दाबता कारच्या ॲक्सिलेटरवर पाय दिला.त्यामुळे थेट विहिरीकडे झेपावली.

दुदैवी! कार चालवताना ब्रेक ऐवजी ॲक्सिलेटर दाबला.. अन कार थेट विहिरीत कोसळली ; चालक महिलेचा मृत्यू
हिस्सारमध्ये एकाच दुचाकीवर स्वार असलेल्या तिघांचा होरपळून मृत्यू
Follow us on

पुणे – जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करंदी येथे कारवरील ताबा सुटल्याने कार थेट विहिरीत जाऊन कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत30  वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे वर्षा आदक असे नाव असून, त्या कार शिकण्याचा प्रयत्न करत असतांना ही दुर्घटना घडली आहे. वर्षा यांनी कार चालवत असताना समोर दुचाकी आल्याने त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला , त्याचवेळी ब्रेक दाबण्याऐवजी ॲक्सिलेटर दाबला गेल्याने कार थेट विहिरीत जाऊन कोसळली. यातच त्यांचा दुदैवी अंत झाला आहे.

नेमके काय घडले

वर्षा दिपक आदक (वय 30 ) हे आपल्या पती दिपक प्रभाकर आदक (वय 30) यांच्या सोबत कार शिकण्यासाठी गेल्या होत्या. करंदी येथील पऱ्हाडवाडी रोडवर त्या कार शिकण्याचा प्रयत्न करत होत्या. कार शिकत असताना त्यांच्या समोर दुचाकी आली त्यावेळी पती दीपक यांनी वर्षां यांना ब्रेक दाबायला सांगितले मात्र वर्षा यांनी ब्रेक न दाबता कारच्या ॲक्सिलेटरवर पाय दिला.त्यामुळे थेट विहिरीकडे झेपावली. याच दरम्यान पती दीपक यांनी वर्षा बसलेल्या बाजूच्या काचेंचून तिला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र वर्षा बाहेर पडू शकल्या नाहीत. त्याचा दरम्यान दीपक यांनी स्वतः कारच्या बाहेर निघत तिला बाहेर काढले. विहिरीतील पाईपला धरून ओरडल्याने बाजूचे लोक पळत आले. रस्त्यावरून जाणाऱ्या स्थानिकांनी विहीरीकडे धाव घेतली. दोघांनाही बाहेर काढले. मात्र विहिरीतून बाहेर काढल्यानंतर वर्षा यांची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे, पोलीस हवालदार संदीप कारंडे, पोलीस नाईक विकास पाटील, राहुल वाघमोडे यांनी घटना स्थळी धाव घेत पाहणी केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप कारंडे व विकास पाटील हे करत आहे.पती दीपक आदक यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

Nagpur ZP : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम, दोन हजार लाभार्थ्यांची तपासणी

Mumbai : बावनकुळे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत का? नसीम खान यांचे बावनकुळेंना तिखट सवाल

Latur Market | सोयाबीनचे दर घटले अन् पुन्हा स्थिरावले, शेतकऱ्यांची मात्र द्विधा मनस्थिती