Mumbai : बावनकुळे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत का? नसीम खान यांचे बावनकुळेंना तिखट सवाल

Mumbai : बावनकुळे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत का? नसीम खान यांचे बावनकुळेंना तिखट सवाल
नसीम खान यांचं बाळासाहेब थोरातांना पत्र

चंद्रशेखर बावनकुळे कांग्रेसचे प्रवक्ते आहेत का? त्यांचीच जागा होती, काँग्रेसची नव्हती. दोन जागा लढवल्या, त्यात कोल्हापुरात बिनविरोध निवडूण आलोय अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नसीम खान यांनी आजच्या निकालवर दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 14, 2021 | 4:12 PM

मुंबई : आज लागललेल्या निवडणुकांच्या निकालावर राजकीय गोटातून जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा विजय झाल्यावर त्यांनी लगेच काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. त्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून बावनकुळेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. बावनकुळेंनी केलेल्या टिकेनंतर काँग्रेस नेते नसीम खान यांनी बावनकुळेंना काही तिखट सवाल विचारले आहे.

बावनकुळे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत का?

चंद्रशेखर बावनकुळे कांग्रेसचे प्रवक्ते आहेत का? त्यांचीच जागा होती, काँग्रेसची नव्हती. दोन जागा लढवल्या, त्यात कोल्हापुरात बिनविरोध निवडूण आलोय अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नसीम खान यांनी आजच्या निकालवर दिली आहे. तर 6 महिन्यांपूर्वीच जी जागा भाजपची होती ती आम्ही निवडून आणली, त्यामुळे भाजपला बोलण्याचा अधिकार नाही असेही ते म्हणाले आहेत.

बिनबुडाचे आरोप करणे भाजपची जुनी सवय

कांग्रेसच्या नेत्यांची इमेज खराब करायची, बिनबुडाचे आरोप करायचे ही भाजपची जूनी सवय आहे. मतं फुटण्याचा विषय हा भाजपला जास्त माहीत आहे, मत फोडण्यासाठी भाजप पैशांचा वापर करत आहे. याची चौकशी करुन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही नसीम खान यांनी केली आहे.

समान-किमान कार्यक्रमात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा

मुस्लिम आरक्षणावर बोलताना, आम्हाला एमआयएमच्या प्रचाराची गरज नाही, मुस्लिम आरक्षण काँग्रेसचा अजेंडा आहे, मिनिमम कॉमन प्रोग्राममध्येही मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाचा ऊल्लेख आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आम्ही पत्र दिले आहे, ते याबाबत निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

Latur Market | सोयाबीनचे दर घटले अन् पुन्हा स्थिरावले, शेतकऱ्यांची मात्र द्विधा मनस्थिती

Obc reservation : ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीला पुन्हा ‘तारीख पे तारीख’, उद्या पुन्हा युक्तिवाद होणार

राहुल गांधींचा मुंबईतील मेळावा पुढे ढकलला; भाई जगतापांनी सांगितलं वेगळं कारण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें