अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची पुतणी असल्याचं सांगत 50 लाखांच्या खंडणीची मागणी, पुणे पोलिसांकडून तरुणीला अटक

| Updated on: May 21, 2021 | 11:46 AM

पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे पोलिसांनी प्रियदर्शनी निकाळजे या तरुणीला अटक केलीय.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची पुतणी असल्याचं सांगत 50 लाखांच्या खंडणीची मागणी, पुणे पोलिसांकडून तरुणीला अटक
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन
Follow us on

पुणे : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची पुतणी असल्याचं सांगून एका तरुणीने पुण्यातील एकाला 50 लाखाच्या खंडणीची मागणी केलीय. या प्रकरणी पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे पोलिसांनी प्रियदर्शनी निकाळजे या तरुणीला अटक केलीय. त्याचबरोबर धीरज साबळे या तरुणीच्या साथीदाराला पोलिसांनी 25 लाखाची खंडणी घेताना रंगेहात पडकलं होतं. आपण राजकीय पक्षाची जिल्हाध्यक्ष आहे असं सांगत जीव प्यारा असेल तर 50 लाखाच्या खंडणीची मागणी आरोपींनी केली होती. (Pune police arrest accused in Rs 50 lakh ransom case)

खंडणीचं हे प्रकरण 2020 मधील असल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रियदर्शनी निकाळजे हिने मार्च 2020 मध्ये एका व्यक्तीला 50 लाख रुपयाची खंडणी मागितील होती. आपण एका राजकीय पक्षाची जिल्हाध्यक्ष आहोत. तसंच छोटा राजनची पुतणी आहे. आमचा डीएनएही एक आहे. तुला जीव प्यारा असेल तर 50 लाख रुपये दे, अशी धमकी निकाळजेनं दिली होती. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सापळा रचून 25 लाखाची खंडणी स्वीकारताना धीरज साबळे याला रंगेहात पकडलं होतं. मात्र, मुख्य आरोपी प्रियदर्शनी निकाळजे मात्र फरार होती.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची कोरोनावर मात

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने कोरोनावर मात केलीय. छोटा राजन याची प्रकृती आता चांगली असून त्याला AIIMS मधून डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यानंतर त्याची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे. छोटा राजन याला तिहार जेल नंबर 2 मध्ये कडेकोट सुरक्ष्या व्यवस्थेत ठेवण्यात आलंय. 22 एप्रिल रोजी छोटा राजनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. प्रकृती बिघडल्यामुळे 25 एप्रिल रोजी त्याला दिल्लीतील AIIMS रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी छोटा राजन याच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. पण ती खोटी असल्याचं काही वेळातच समोर आलं. छोटा राजन याचा कोरोनामुळे मृत्यू झाला ही बातमी खोटी असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत, असं स्पष्टीकरण AIIMS कडून त्यावेळी देण्यात आलं होतं. तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यात ही शिक्षा सुनावली होती.

छोटा राजन कोण आहे?

छोटा राजन ऊर्फ नाना, याचं खरं नाव राजन सदाशिव निकाळजे असं आहे. तो सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्ब हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, कालांतराने दोघांमध्ये टोकाचं शत्रूत्व निर्माण झालं.

छोटा राजनने मुंबईतील एका चित्रपटगृहाबाहेर ब्लॅक तिकीट विकण्याचं काम सुरु केलं. त्यानंतर त्याची भेट राजन नायर ऊर्फ बडा राजन याच्याशी भेट झाली. बडा राजनकडून त्याने चुकीच्या आणि गुन्हेगारीच्या अनेक गोष्टी शिकल्या. येथूनच त्याच्या गुन्हेगारी विश्वातील कट-कारस्थानाला सुरुवात झाली. तो दारुची तस्करी करु लागला. बडा राजनच्या मृत्यूनंतर गुन्हेगारी विश्वात तो छोटा राजन म्हणून नावरुपाला आला. त्याच्यावर खंडनी, हत्येची, तस्करीचे अनेक मोठमोठे आरोप आहेत. सध्या तो जेलमध्ये शिक्षा भोगतोय.

छोटा राजन विरोधात 17 हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हेल दाखल आहेत. तो कित्येक वर्षांपासून फरार होता. मात्र, 2015 साली त्याला इंडोनेशियातून अटक करण्यात आली.

संबंधित बातम्या :

पुण्यात निवृत्त पोलिसाच्या शेतातून रोज सहा टँकर पाणीचोरी, राष्ट्रवादीने हाकललेला माजी पदाधिकारी निघाला आरोपी

पुण्यात गुन्हेगाराची हत्या, अंत्ययात्रेला शेकडो बाईक्सची रॅली, 80 समर्थक ताब्यात

Pune police arrest accused in Rs 50 lakh ransom case