AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Porsche Accident : पोर्श अपघात प्रकरणात सर्वात मोठी बातमी; 2 डॉक्टर निलंबित, डॉ. काळे सक्तीच्या रजेवर

पुणे पोर्श अपघात प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या अपघात प्रकरणात ब्लड सँपल बदलल्या प्रकरणी अखेर दोन डॉक्टर आणि एका वॉर्डबॉयला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तिघांनाही निलंबित करण्यात आले आहे.

Pune Porsche Accident : पोर्श अपघात प्रकरणात सर्वात मोठी बातमी; 2 डॉक्टर निलंबित, डॉ. काळे सक्तीच्या रजेवर
| Edited By: | Updated on: May 29, 2024 | 7:32 PM
Share

पोलिसांनी दिलेल्या अहवालानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. या तिघांनाही पोलिसांनी आधीच अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या तिघांना ब्लड सँपल बदलण्यासाठी विशाल अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त आणखी कुणी फोन केले होते? रक्कम किती ठरली होती? हातात किती रक्कम मिळाली होती? याची माहिती पोलीस घेत आहेत.

पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणा दिवसेंदिवस तापू लागलं असून याप्रकरणी आता आणखी एक नवे अपडेट समोर आले आहे. या अपघाताला जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याचे ब्लड सँपल बदलण्यात आलं होतं, त्यामुळे एकच गदारोळ माजला. खुद्द पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीपुणे पोर्श अपघात प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या अपघात प्रकरणात ब्लड सँपल बदलल्या प्रकरणी अखेर दोन डॉक्टर आणि एका वॉर्डबॉयला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तिघांनाही निलंबित करण्यात आले आहे.  हा धक्कादायक खुलासा केला होता. आता या प्रकरणातील तिनही आरोपींचे निलंबन झाल्याचे खुद्द ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांनी जाहीर केलं. डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि अतुल घटकांबळे या तिघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयनी आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याचे समोर आल्यानंतर काल याप्रकरणी चौकशी समितीने कडून तपास करण्यात आला होता. त्यानंतर आज हा निर्णय जाहीर केला.

ससूनचे डीन काय म्हणाले ?

डॉ. अजय तावरे यांच्याकडे असणार कार्यभार आम्ही काढून घेतला आहे. तर डॉ. श्रीहरी हळनोर यांना बडतर्फ केले आहे. ससून रुग्णालयासाठी ही बाब अत्यंत वाईट आहे. अशा पद्धतीने ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करणे चुकीचे आहे. यासंदर्भात पोलिसांनी जी माहिती मागितली आहे ती त्यांना देण्यात आली आहे. माझ्याकडूनही विभागीय आयुक्त आणि आमच्या वरिष्ठांनी माहिती मागितली आहे, असे ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांनी नमूद केले.

दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं ससून रुग्णालयात दाखल झाली आहेत. ससून रुग्णालयात काम करणारा शिपाई अतुल घटकांबळे याला घेऊन पोलीस ससून रुग्णालयात दाखल झाले. या अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने कोणी बदलले, तसेच रक्ताचे नमुने कोणाचे घेतले गेले, पैसे घेऊन ससून मध्ये कोणी कोणाला दिले या सर्व गोष्टींची चौकशी करण्यासाठी घटकांबळे याला ससून मध्ये आणण्यात आले आहे. घटकांबळे हा शवगृहाचा शिपाई आहे.

उशिराने काळे सक्तीच्या रजेवर

दरम्यान, दोन डॉक्टरांवर कारवाई झाल्यानंतर संध्याकाळी उशिराने काळे यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्या जागेवर बारामतीच्या अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलांच्या मित्रांचाही जबाब नोंदवला

दरम्यान ज्या रात्री कल्याणीनगरमध्ये हा अपघात घडला तेव्हा अल्पवयीन मुलासोबत त्याचे दोन मित्रही होते. त्यांचा काल (मंगळवार) संध्याकाळी पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात आला. अपघाता वेळी कार मध्ये उपस्थित असणाऱ्या अल्पवयीन मित्रांचा पुणे पोलिसांनी सविस्तर जबाब नोंदवला. तब्बल २ तास त्यांचा जबाब नोंदवण्यात येत होता. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या मित्रांकडून त्या दिवशी घडलेल्या घटनेची संपूर्ण, सविस्तर हकीकत जाणून घेतली असून त्यांच्या जबाबातून अनेक महत्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता आहे.

त्या पोर्शेची होणार तपासणी, जर्मनीहून येणार कंपनीचे प्रतिनिधी

ज्या पोर्शे कारची धडक बसून हा अपघात झाला त्या कारची तपासणी होणार आहे. या कारची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी पोर्शे कार कंपनीचे जर्मनीतील प्रतिनिधी कारच्या तपासणीसाठी पुण्यात येणार आहेत. सध्या ही कार येरवडा पोलिस ठाण्याबाहेर ठेवण्यात आली असून आजूबाजूला बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.