आला मोठा शूरवीर ! सांभाळा आता त्याला…. घराच्या अंगणात मुलाची ती अवस्था पाहून बापाच्या काळजाचं पाणी झालं !
फिर्यादीच्या सांगण्यानुसार, त्यांचा मुलगा व इतर काही तरूणांमध्ये बऱ्याच काळापासून वाद होता. पूर्व वैमनस्यातूनच हा गुन्हा घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा कसून शोध घेण्यात आहे. त्यांना लवकरच बेड्या पडतील, असे पोलिसांनी सांगितले.

चंदीगड | 22 सप्टेंबर 2023 : माणूस कितीही मोठा, कितीही ताकदवान असला तरी मुलांचा आणि कुटुंबाचा विषय येताच त्याच काळीज थरारतं. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तो काहीही करून शकतो. पण घरच्यांना काहीही झालं तर मात्र तो हादरतो. असाच एक पहाडासारखा बलवान बाप मुलाची अवस्था बघून कोसळला. मुलगा अंगणात पडलेला पाहून त्या काळीज लकाकलं, भीतीने त्याचे हात-पायच गळून गेले. असं नेमकं काय झालं तिथे, त्याने असं काय पाहिलं ?
पंजाबच्या (punjab) कपूरथला गावातील ही एक दुर्दैवी घटना आहे. तेथे काही बदमाशांनी एक युवकाची तलवारीने हत्या (murder) केली. मात्र त्यांची क्रूरता एवढ्या वरच थांबली नाही, ते त्या मुलाचा मृतदेह त्याच्या घराच्या अंगणात घेऊन गेले आणि फेकून दिला. त्याच्या वयोवृद्ध बापावाही त्यांनी चार शब्द सुनावले. मुलाचा मृतदेह पाहून त्या बापाची अवस्था मात्र अतिशय बिकट झाली. ढिलवा ठाणे क्षेत्रातील ढिलवान पत्ती येथे हा दुर्दैवी प्रकार घडला असून संपूर्ण गावच हादरलं आहे. मात्र मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या वयोवृद्ध वडिलांनी पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत.
दोघांमध्ये होते पूर्ववैमनस्य
मात्र या हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिलवान पट्टी लाडू येथील रहिवासी गुरुनाम सिंह यांनी ही तक्रार नोंदवली आहे. त्यांचा मुलगा हरदीप सिंग उर्फ दीपा हा शेती करत होता. त्याच गावातील हरप्रीतसिंग उर्फ हॅप्पी याच्याशी त्याचा बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. याआधीही त्यांच्यात भांडणे झाली होती, त्यासंदर्भात पोलिसांत गुन्हेही दाखल आहेत.
मात्र त्याच्या मुलाला अटकेची भीती वाटत होती. त्याचदरम्यान १९ सप्टेंबर रोजी तो घरी आला आणि बँकेचे पासबुक घेऊन निघून गेला. त्याच रात्री साडेदहाच्या सुमारास ज्याच्याशी वाद सुरू होता तो हरप्रीत हा इतर चार-पाच लोकांसह त्यांच्या घरासमोर आला आणि जोरजोरात हाका मारू लागला. गुरुनाम सिंह बाहेर आले आणि समोर पाहतात तर काय, त्यांच्यासमोर त्यांच्या तरूण मुलाचा मृतदेह पडला होता. त्यांच्यासमोर उभा राहूनच हरप्रीतने त्यांना खिजवले. ‘हा बघा तुमचा शूर मुलगा, अगदी शूरवीर होता ना. आम्ही त्याला कापून काढले’ असे म्हणत तो तिथून फरार झाला. गुरुनाम सिंह यांनी मुलाला लगेचच नजीकच्या रुग्णालयात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
जुन्या वैमनस्यातूनच हरप्रीत सिंग उर्फ हॅप्पी आणि त्याच्या साथीदारांनी मुलाची हत्या केल्याचे गुरनाम सिंग यांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा कसून शोध घेण्यात आहे. त्यांना लवकरच बेड्या पडतील, असे पोलिसांनी सांगितले.
