राजा रघुवंशीच्या कुटुंबावर आणखी एक मोठं संकट! महिलेने सादर केला डीएन अहवाल अन्… नेमकं काय झालं?

इंदूर येथील राजा रघुवंशी हत्याकांडानंतर आता त्याचा भाऊ सचिन याच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केला आहे. या महिलेने आपल्या मुलाचा डीएनए अहवाल माध्यमांसमोर सादर केला आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया..

राजा रघुवंशीच्या कुटुंबावर आणखी एक मोठं संकट! महिलेने सादर केला डीएन अहवाल अन्... नेमकं काय झालं?
Raja Raghuvanshi
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 05, 2025 | 5:35 PM

लग्नाच्या काही दिवसांनंतर लगेच शिलांग येथे हनीमूनला गेलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. पत्नी सोनमनेच राजाचा हत्येचा कट रचला. सोनमवरील सर्व आरोप सिद्ध झाले असून ती सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. अशातच आता राजाचा भाऊ सचिन रघुवंशी याच्या अडचणी वाढल्या आहेत. सचिनच्या कथित पत्नीने आपल्या दीड वर्षांच्या मुलाचा डीएनए तपासणी अहवाल सार्वजनिक केला आहे. अहवालानुसार, मुलाचा जैविक पिता सचिन रघुवंशीच आहे. या खुलाशाने संपूर्ण रघुवंशी कुटुंबावर पुन्हा एक मोठे संकट आले आहे.

पीडित महिलेने माध्यमांसमोर अहवाल सादर करताना सांगितले की, सत्य आता उघड झाले आहे. आता सचिन आणि त्याच्या कुटुंबाने यावर स्पष्टपणे उत्तर द्यावे. महिलेने दावा केला की, सचिनशी तिचा विवाह पारंपरिक पद्धतीने झाला होता आणि याचा पुरावा म्हणून तिच्याकडे मंदिरात झालेल्या विधींचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. तिने असा आरोप केला आहे की, विवाहानंतर सचिन आणि त्याच्या कुटुंबाने तिला समाजापासून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या मुलालाही स्वीकारण्यास नकार दिला.

वाचा: मोठी अपडेट! सोनमला जराही पश्चाताप नाही, कैद्यांसोबत मजामस्ती सुरु; तुरुंगात नेमकं काय सुरु

महिलेने केला गंभीर आरोप

पीडित महिलेने सांगितले की, तिने अनेकदा न्यायालयाचे दार ठोठावले, पण प्रत्येक वेळी कुटुंबाने तिला दुर्लक्षित केले. ती म्हणाली, “माझे मूल आज दरोदार भटकत आहे. सचिन आणि त्याच्या कुटुंबाला लाज वाटली पाहिजे की त्यांनी एका स्त्री आणि मुलाचा असा छळ केला आहे.”

राजा रघुवंशी हत्येनंतर आता नवी खळबळ

रघुवंशी कुटुंबीय हे आधीच चर्चेत होते. कारण राजा रघुवंशी यांच्या हनिमूनदरम्यान झालेल्या रहस्यमयी हत्येने खळबळ उडाली होती. आता सचिन रघुवंशी यांच्या मुलाचा डीएनए अहवाल समोर आल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सध्या राजा यांच्या हत्येच्या गुन्ह्यासाठी सोनम रघुवंशी तुरुंगात आहे.

राजाची पत्नी 21 जूनपासून तुरुंगात

सोनम रघुवंशी 21 जूनपासून तुरुंगात आहे, म्हणजेच तिला तुरुंगात एक पूर्ण महिना झाला आहे. सोनमबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. सोनमला गेल्या एक महिन्यापासून तुरुंगात कोणी भेटायला आले नाही, ना तिचा भाऊ, ना वडील, ना आई, ना कोणी ओळखीचे. पण याचा सोनमला काही पडत नाही, ती आपल्या कुटुंबीयांची आठवणही काढत नाही. तसेच तिला राजा रघुवंशीच्या खुनाचा कोणताही पश्चाताप नाही, ती याबाबत तुरुंगात कोणाशीही बोलत नाही.