AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनम सापडली.. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

मेघालयला हनिमून गेल्यानंतर इंदूरचं एक जोडपं बेपत्ता झालं होतं. काही दिवसांपूर्वी राजा रघुवंशीचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर आता त्याची पत्नी सोनम रघुवंशीसुद्धा सापडली आहे. परंतु या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

सोनम सापडली.. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशीImage Credit source: ANI
| Updated on: Jun 09, 2025 | 9:08 AM
Share

मेघालयातील शिलाँग इथं हनिमूनसाठी गेलेलं दाम्पत्य राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता होण्याचं गूढ अखेर उलगडलं आहे. शिलाँगमध्ये राजा रघुवंशी याची हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह डोंगरावर आढळला होता. तर त्याची पत्नी सोनम रघुवंशी बेपत्ता झाली होती. आता सोनमला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथून अटक केली आहे. गाझीपूरचे अतिरिक्त एसपी ज्ञानेंद्र प्रसाद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान या प्रकरणात मेघालयच्या डीजीपींनी असंही म्हटलंय की राजाची पत्नीच कथितपणे या हत्या प्रकरणात सहभागी होती.

सोनमने राजाला मारण्यासाठी गुन्हेगारांना कामावर ठेवलं होतं. या प्रकरणाच त्याची पत्नी सोनमसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. सोनम व्यतिरिक्त इतर तीन आरोपीदेखील मध्य प्रदेशातील आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून महत्त्वाची माहिती शेअर केली. त्यांनी लिहिलं, ‘राजा रघुवंशी हत्याकांडात पोलिसांनी अवघ्या सात दिवसांत मोठं यश मिळवलं आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. तर एका महिला आरोपीने आत्मसमर्पण केलं आहे.’ या प्रकरणी पोलिसांची शोध मोहीम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. या जलद कारवाईबद्दल संगमा यांनी मेघालय पोलिसांचं कौतुकही केलं.

नेमकं काय आहे प्रकरण?

सोनम ही इंदूरच्या गोविंद कॉलनीची रहिवासी आहे. गेल्या वर्षी 11 मे रोजी तिने राजा रघुवंशी याच्याशी लग्न केलं होतं. सोनमने बी. कॉमपर्यंत शिक्षण घेतलं आहे. लग्नानंतर हे जोडपं शिलाँगला फिरायला गेलं होतं. त्यानंतर अचानक हे दोघं बेपत्ता झाले. शोध घेतला असता राजाचा मृतदेह शिलाँगच्या टेकडीवर आढळला होता. सोनम आणि राजा आधी गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर दोघंही तिथून शिलाँगला पोहोचले होते. त्यानंतर दोघंही तिथून अचानक गायब झाले होते. याप्रकरणी आता सोनमने आत्मसमर्पण केलं आहे. दरम्यान सोनमला कोणतीही दुखापत झालेली नसून ती पूर्णपणे ठीक आहे. सध्या पोलिसांनी तिला उत्तरप्रदेशातील गाझीपूर इथल्या वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवलंय.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.