
मध्य प्रदेशमधील इंदौरच्या राजा रघुवंशी याच्या हत्येमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. आपल्या बायकोसोबत हनीमूनला गेल्यानंतर त्याचा तिथेच खून करण्यात आला. विशेष म्हणजे त्याचा मृतदेह खोल दरीत आढळला आहे. दरम्यान, आता राजा रघुवंशी याच्याच बायकोने म्हणजेच सोनम रघुवंशी हिनेच त्याचा खून केल्याचा पोलिसांना संशय आला आहे. सध्या एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, या फुटेजला पाहून पोलिसांचा तिच्यावरील संशय आणखीनच बळावला आहे.
सध्या एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे दोघेही दिसत आहेत. ते दोघेही दुचाकीवर बसून कुठेतरी बाहेर जाताना दिसतायत. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये सोनम पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि काल्या रंगाची पँट परिधान केलेली दिसत आहे.
याच व्हिडीओत राजा रघुवंशी हेल्मेट सांभाळताना दिसतोय. तर दुसरीकडे सोनम आपल्या फोनमध्ये व्यग्र असलेली पाहायला मिळत आहे. इकडे राजा बाईकवर बसलेला असताना ती फोनमध्ये लांब जाऊन काहीतरी टाईप करताना दिसत आहे. त्यानंतर थोड्या वेळाने ती स्कुटीवर जाऊन बसली आहे. पुढे दोघेही कुठेतरी निघून गेल्याचे या सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे.
सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या सोमनच्या हालचाली संदिग्ध असल्याचा दावा केला जात आहे. समोर नवरा बसलेला असताना ती फोनमध्ये नेमकं काय करत असावी? असा प्रश्न केला जातोय. तसेच लांब जाऊन फोमध्ये ती कोणाला मेसेज करत होती का? असाही सवाल उपस्थित करण्यात आलाय.
दरम्यान, सध्या सोनम रघुवंशी ही पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत. तिने मी राजाचा खून केला नसल्याचा दावा केलाय. उलट मला किडनॅप करण्यात आलं होतं, असंही तिने म्हटलंय. त्यामुळे आता नेमकं काय होणार? राजाची हत्या कोणी केली, हे समोर येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.