अजून एक सोनम रघुवंशी, वेटरच्या प्रेमासाठी नवविवाहित अंजलीचा खतरनाक कट, उच्चशिक्षित नवऱ्यासोबत जे केलं त्याने सगळेच हादरले

तीन महिन्यांपूर्वी 23 वर्षाच्या अंजलीचं आशिष सोबत लग्न झालं होतं. अंजली पोस्ट ग्रॅज्युएट आहे. आशिषही उच्चशिक्षित होता. पण अंजली एका वेटरच्या प्रेमात होती. ते प्रेम मिळवण्यासाठी तिने जे केलं, त्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.

अजून एक सोनम रघुवंशी, वेटरच्या प्रेमासाठी नवविवाहित अंजलीचा खतरनाक कट, उच्चशिक्षित नवऱ्यासोबत जे केलं त्याने सगळेच हादरले
anjali - ashish
| Updated on: Feb 06, 2026 | 9:13 AM

मागच्यावर्षी राजा रघुवंशी हत्याकांड देशभरात गाजलं होतं. पत्नी सोनम रघुवंशीने हनीमूनला गेल्यानंतर तिथे प्रियकराला बोलवून घेत पती राजाची निर्घृण हत्या केली होती. आत्ताही त्याच घटनेच्या आठवणी ताज्या करणारं प्रकरण घडलं आहे. एक नवविवाहितेने प्रियकरासोबत मिळून कथितरित्या पतीची हत्या केली. तिच्या लग्नाला अवघे तीनच महिने झाले होते. ही हत्या केल्यानंतर तिने हिट अँड रनच प्रकरण दाखवण्याचा प्रयत्न केला. मेडिकल रिपोर्टमधून या कारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमधील हे प्रकरण आहे.

तीन महिन्यांपूर्वी 23 वर्षाच्या अंजलीचं आशिष सोबत लग्न झालं होतं. अंजली या लग्नावर अजिबात खुश नव्हती. काही दिवसांपूर्वी ती माहेरी गेली होती. तिथे तिने प्रियकर संजू आणि त्याचे दोन साथीदार रॉकी व बादल सोबत मिळून आशिषच्या हत्येचा कट रचला. प्लाननुसार अंजली 30 जानेवारीला आशिषला फेरफटका मारण्याच्या बहाण्याने एका निर्जन रस्त्यावर घेऊन गेली. तिथे संजू आणि त्याचे मित्र झुडपात लपून बसले होते. अंजली आणि आशिष फिरत असताना अचानक तिघे समोर आले. त्यांनी आशिषवर हल्ला करुन त्याची हत्या केली. अंजलीने आपल्या अंगावरचे दागिने आणि फोन संजूकडे दिला.

अंजली आणि आशिष बेशुद्ध अवस्थेत सापडले

जेणेकरुन हे लुटमारीच्या उद्देशाने झालय असं वाटावं. रात्री 9 वाजता अंजली आणि आशिष बेशुद्ध अवस्थेत सापडले. दोघांना रुग्णालयात नेल्यानंतर आशिषला मृत घोषित केलं. अंजलीने हे प्रकरण हिट अँड रनचं आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला एका गाडीने धडक दिली. त्यानंतर त्यांनी माझ्या अंगावरचे दागिने लुटले असं तिने पोलिसांना सांगितलं. मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर सत्य काय ते समोर आलं. आशिषचा मृत्यू हा मारहाण आणि गळा आवळल्यामुळे झाला होता. पोलिसांना काही गोष्टी लक्षात आल्या. त्यांनी अंजलीची कसून चौकशी सुरु केल्यानंतर तिने खरं काय ते सांगितलं. पोलिसांनी अंजली, संजू आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केलीय.

अंजली पोस्ट ग्रॅज्युएट आहे

या प्रकरणात आता अजून नवनवीन खुलासे होत आहेत. अंजलीनो ज्या संजूसाठी पतीची हत्या केली, तो मुलगा अजिबात शिकलेला नाही. लग्नात तो वेटरचं काम करतो. अंजली पोस्ट ग्रॅज्युएट आहे. आशिषही उच्चशिक्षित होता.