स्वप्नात यायच्या तीन बायका, रात्री जंगलात जाऊन…मृत्यूच्या भयानक खेळाने खळबळ; नेमकं काय घडलं?

सध्या एक भयानक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाच्या स्वप्नात नेहमी तीन बायका यायच्या. त्यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. त्याच्या भयानक मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्वप्नात यायच्या तीन बायका, रात्री जंगलात जाऊन...मृत्यूच्या भयानक खेळाने खळबळ; नेमकं काय घडलं?
CRIME AND SUPERSTITION NEWS
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 11, 2026 | 3:56 PM

तंत्र-मंत्र आणि जादूटोण्याचं जग भारच भयानक आहे. इथे एखादं सावज सापडलं की तांत्रिक-मात्रिक त्याला पुरतं लुटून खातात. विशेष म्हणजे आजारी असलेल्या व्यक्तीवर मोठ्या भूताने कब्जा केलेला आहे. चेटकीण किंवा अन्य जीवघेण्या आत्म्याचा शरीरात वावर असल्याचे भसवले जाते. यातच संबंधित व्यक्ती गुरफटून जाते आणि शेवटी त्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत होतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वप्नात नेहमी तीन महिला येऊन त्रास देत असल्याने एका अवघ्या 25 वर्षीय तरुणाने स्वत:चा जीव घेतला आहे. स्वप्नातल्या बायकांना घाबरून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रामदास असे आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तो मानसिकदृष्ट्या आजारी होता. त्याच्या स्वप्नात सतत तीन महिला यायच्या. या महिला त्याला त्याला स्वप्नात घाबरवायच्या. तसेच भयानक स्वप्नांमध्ये महिला त्याला त्रासही द्यायच्या. सतत महिलांची स्वप्ने येत असल्याने तो फारच त्रासून गेला होता. आमच्या मुलावर कोणीतरी जादू केली आहे, कोणीतरी करणी केली आहे, असे या तरुणाच्या कुटुंबीयांना वाटायचे.

मांत्रिक जादुटोना करायचा

याच शंकेपोटी रामदासच्या कुटुंबीयांनी त्याला मध्यपदशातील खंडवा जिल्ह्यातील अंबापाट या गावातील एका मांत्रिकाकडे नेले होते. तेथे मांत्रिक स्वप्नातील बायकांना पळवून लावण्यासाठी त्याच्यावर जादूटोना करत होता. अंबापाट या गावात रामदासची बहीण राहायची. याच बहिणीच्या ओळखीने रामदासचे कुटुंबीय त्याला मांत्रिकाकडे घेऊन गेले होते.

पुन्हा भीतादायक स्वप्ने पडायला लागली

रामदासच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मांत्रिकाकडे गेल्यानंतर रामदास तीन महिने व्यवस्थित होता. परंतु आता पुन्हा एकदा त्याला तीन महिलांची स्वप्ने पडायला लागायची. त्याला भीतीदायक स्वप्ने पडायची. हा त्रास पुन्हा जाणवत असल्याने रामदास फाच त्रासलेला होता. यातूनच त्याने शेवटी गुरुवारी रात्री गावातील जंगलात जाऊन विष प्राशन केले आणि स्वत:चाच जीव घेतला.

दरम्यान, पोलिसांनी रामदासच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले आहे. रामदासने तणावामुळे स्वत:ला संपवले की त्याच्या मृत्यूमागे काही घातपात आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. परंतु अंधश्रद्धेला बळी पडल्याने रामदासचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.