कोपरगावात मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा, अडीच लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल चोरीला

| Updated on: Sep 16, 2022 | 12:00 AM

चाकूचा धाक दाखवून 6 ते 7 जणांच्या टोळीने त्यांच्या घरात प्रवेश केला. सोनावणे आणि घरातील दोन महिलांवर हल्ला करुन त्यांच्या घरातील ऐवज लुटला.

कोपरगावात मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा, अडीच लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल चोरीला
कोपरगावात मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा
Image Credit source: TV9
Follow us on

अहमदनगर : चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी (Robbers) 2 लाख 81 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारातील रहिवासी अनिल हरिभाऊ सोनवणे यांच्या घरी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी अनिल सोनवणे यांच्यासह घरातील दोन महिलांनाही दरोडेखोरांनी हल्ला (Attack) करुन जखमी (Injured) केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, डीवायएसपी संजय सातव, एलसीबी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी घटनास्थळी भेट दिली.

मध्यरात्री घरात घुसले दरोडेखोर

अनिल सोनवणे यांचे कुटुंब रात्री झोपले असताना रात्री 1.30 च्या सुमारास कुणीतरी खिडकी वाजवत असल्याचे ऐकू आले. त्यांनी उठून पाहिले असता खिडकीजवळ 3-4 संशयित आढळून आले. त्यांनी त्यांना जाब विचारला असता दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून दरवाजा उघडण्यास भाग पाडले.

तिघांवर हल्ला करुन ऐवज लुटला

चाकूचा धाक दाखवून 6 ते 7 जणांच्या टोळीने त्यांच्या घरात प्रवेश केला. सोनावणे आणि घरातील दोन महिलांवर हल्ला करुन त्यांच्या घरातील ऐवज लुटला. त्यानंतर सोयाबीन पिकाच्या शेतात जाऊन त्यातील वस्तू नेल्या. लुटमार केल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरुन फरार झाले.

हे सुद्धा वाचा

गावकऱ्यांनी जखमींना रुग्णालयात नेले

घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी सोनावणे यांच्या घराकडे धाव घेत जखमींना उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले. त्यानंतर त्यांनी पुढील उपचारासाठी शिर्डी येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात हलवले.

कोपरगाव पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आल. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. श्वानपथकास पाचारण करण्यात आले. पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.