AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi : निष्पापांची हत्या सहन केली जाणार नाही… पंतप्रधान मोदींचा इस्रायली संसदेत हमासवर हल्ला

PM Modi Israel Parliament Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर गेले आहे. यावेळी संसदेत भाषण करताना पंतप्रधान मोदींनी हमासवर शा‍ब्दिक हल्ला केला.

PM Modi : निष्पापांची हत्या सहन केली जाणार नाही... पंतप्रधान मोदींचा इस्रायली संसदेत हमासवर हल्ला
PM Modi israel SpeechImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 25, 2026 | 10:30 PM
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ वर्षांनंतर पुन्हा इस्रायलच्या दौऱ्यावर गेले आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नीने विमानतळावर पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना विशेष गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी इस्रायली संसदेला संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले की, “भारतीय जनतेच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. संसदेला संबोधित करणारा हा माझ्यासाठी पहिला भारतीय पंतप्रधान असण्याचा अभिमानाचा क्षण आहे. मला पुन्हा येथे येऊन खूप आनंद झाला आहे.”

भारत इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, ‘भारतीय जनतेच्या वतीने मी 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या भयानक हमास दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करतो. प्रत्येक कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत. आम्ही तुमचे दुःख समजतो.हमासचे नाव घेत पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध आवाज उठवला. मोदी म्हणाले की, निष्पाप नागरिकांची हत्या सहन केली जाणार नाही. दहशतवादाला शून्य सहनशीलता असली पाहिजे. जगाने त्याविरुद्ध एकजुटीने भूमिका घेतली पाहिजे. भारत पूर्ण आत्मविश्वासाने इस्रायलसोबत खंबीरपणे उभा आहे.’

शांतीचा मार्ग सोपा नसतो

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मंजूर केलेला गाझा शांतता उपक्रम हा एक चांगला मार्ग आहे. भारताने यासाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या प्रदेशातील सर्व लोकांसाठी, पॅलेस्टिनी समस्येच्या निराकरणासह, न्याय्य आणि चिरस्थायी शांततेचे प्रयत्न सुरू आहेत. शांतीचा मार्ग नेहमीच सोपा नसतो, परंतु या प्रदेशात संवाद, शांती आणि स्थिरतेसाठी भारत तुमच्या आणि जगासोबत उभा आहे.

इस्रायली संसदेत “मोदी, मोदी” घोषणाबाजी

तत्पूर्वी, संसदेत “मोदी, मोदी” च्या घोषणा देण्यात आल्या. नेसेटचे सभापती अमीर ओहाना यांनी हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे असं म्हणत पंतप्रधानांचे नमस्ते म्हणत स्वागत केले. ओहाना म्हणाले की, ‘भारत हा सर्वात वेगाने वाढणारा देश आहे. भारत आणि इस्रायल हे खरे मित्र आहेत. भारताने यहुद्यांना घर दिले. मुंबई दहशतवादी हल्ला असो किंवा पहलगाम, इस्रायल तुमच्यासोबत आहे.’

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?