ऑडी इमारतीवर आदळून भीषण अपघात, आमदाराच्या मुलगा-सुनेसह सात जणांचा मृत्यू

| Updated on: Aug 31, 2021 | 9:43 AM

ऑडी कार अपघातात सात जणांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कर्नाटकातील बंगळुरु शहरातील दक्षिणेला असलेल्या कोरमंगल (Koramangala) भागात सोमवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला

ऑडी इमारतीवर आदळून भीषण अपघात, आमदाराच्या मुलगा-सुनेसह सात जणांचा मृत्यू
बंगळुरुत ऑडी कारच्या अपघातात आमदारपुत्राचे निधन
Follow us on

बंगळुरु : आलिशान ऑडी कार रस्त्याशेजारील विजेचा खांब आणि इमारतीवर आदळून बंगळुरुत (Bengaluru car crash) भीषण अपघात झाला. या अपघातात द्रमुक आमदार वाय प्रकाश (Y Prakash) यांच्या मुलगा-सुनेसह सात जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. भरधाव ऑडी कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कसा झाला अपघात

ऑडी कार अपघातात सात जणांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कर्नाटकातील बंगळुरु शहरातील दक्षिणेला असलेल्या कोरमंगल (Koramangala) भागात सोमवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. रस्त्याच्या शेजारी असलेल्या बिल्डिंग आणि विजेच्या खांबावर भरधाव वेगात असलेली ऑडी Q3 (Audi Q3) कार धडकली.

आमदारपुत्रासह सूनेचाही मृत्यू

या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाने हॉस्पिटलला नेले जात असताना वाटेत प्राण सोडले. तामिळनाडूतील होसुरचे द्रमुक आमदार व्हाय प्रकाश यांचे पुत्र करुणा सागर (Karuna Sagar) आणि सून बिंदू ( Bindu) यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. खुद्द आमदार वाय प्रकाश यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र इतर मृतांची नावं अद्याप समजेलली नाहीत.

अपघाताचे भीषण फोटो

दरम्यान, मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही दिवसांपूर्वी रेंज रोवर कारचा (Range Rover) मोठा अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातातून कार चालक सुखरुप बचावला, मात्र गाडीचं मोठं नुकसान झालं होतं. कारवर खासदाराचा लोगो लावला असून नंबरप्लेटवर भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ दिसत होतं

संबंधित बातम्या :

VIDEO | मुंबईत रेंज रोवर कारचा अपघात, भरधाव गाडी दुभाजकावर धडकली, काचेवर भाजप खासदाराचे चिन्ह

PHOTO : मुंबईत बेस्ट बसला अपघात, चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने बस थेट भाजीच्या दुकानात

मुंबई-बंगळुरु महामार्गावर अपघात, तिघांचा मृत्यू, कारचा चेंदामेंदा