VIDEO | मुंबईत रेंज रोवर कारचा अपघात, भरधाव गाडी दुभाजकावर धडकली, काचेवर भाजप खासदाराचे चिन्ह

पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव आरे चेकनाकाच्या ब्रिज जवळ शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. भरधाव वेगाने जात असलेली रेंज रोवर कारचा मोठा अपघात झाला.

VIDEO | मुंबईत रेंज रोवर कारचा अपघात, भरधाव गाडी दुभाजकावर धडकली, काचेवर भाजप खासदाराचे चिन्ह
अपघातग्रस्त रेंज रोवर गाडी


मुंबई : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर शनिवारी रात्री रेंज रोवर कारचा (Range Rover) मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून कार चालक सुखरुप बचावला, मात्र गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. कारवर खासदाराचा लोगो लावला असून नंबरप्लेटवर भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ दिसत आहे.

नेमकं काय घडलं?

पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव आरे चेकनाकाच्या ब्रिज जवळ शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. भरधाव वेगाने जात असलेली रेंज रोवर कारचा मोठा अपघात झाला. गाडी अंधेरीच्या दिशेने जात असताना कार चालक तरुणाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट डिव्हायडरला धडकून मोठा अपघात झाला.

अपघातानंतर ट्राफिक जाम

या अपघातामुळे मध्यरात्री जोगेश्वरी ते बोरिवलीच्या दिशेने जाणारी वाहतूक आणि गोरेगाव ते अंधेरीच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र वाहतूक पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेऊन त्यांनी कार बाजूला घेतली. त्यानंतर पश्चिम दृतगती महामार्गाची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु करण्यात आली.

पाहा व्हिडीओ :

कारवर खासदाराचा लोगो

दरम्यान, रेंज रोवर कारवर खासदाराचा लोगो लावला असून नंबरप्लेटवर भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ दिसत आहे. त्यामुळे ही गाडी कोणत्या भाजप खासदाराची आहे, याची चर्चा रंगली होती. अपघातातून सुदैवाने कार चालक सुखरुप वाचला, मात्र रेंज रोवर कारचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी रेंज रोवर कार ताब्यात घेऊन हा अपघात कशामुळे झाला याची चौकशी सुरु केली आहे.

संबंधित बातम्या :

PHOTO : मुंबईत बेस्ट बसला अपघात, चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने बस थेट भाजीच्या दुकानात

मुंबई-बंगळुरु महामार्गावर अपघात, तिघांचा मृत्यू, कारचा चेंदामेंदा

(Mumbai Range Rover Car Accident at Goregaon Western Express Highway has BJP MP Logo)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI