उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला IAS ऑफिसरची छेड, हरियाणातील विकृत प्रकार

| Updated on: Mar 23, 2021 | 2:42 PM

हरियाणाच्या फरीदाबाद येथून अत्यंत घाणेरडी आणि विचित्र घटना समोर आली आहे (sexual harassment of woman IAS officer in deputy CM Dushyant Chautala programme).

उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला IAS ऑफिसरची छेड, हरियाणातील विकृत प्रकार
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

चंदिगड : हरियाणाच्या फरीदाबाद येथून अत्यंत घाणेरडी आणि विचित्र घटना समोर आली आहे. फरीदाबादमध्ये रविवारी (21 मार्च) जननायक जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या कार्यक्रमात एका विकृताने महिला IAS ऑफिसरची छेड काढली. संबंधित आरोपी हा जननायक पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या आरोपीला स्थानिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत (sexual harassment of woman IAS officer in deputy CM Dushyant Chautala programme).

नेमकं प्रकरण काय?

दुष्यंत चौटाला रविवारी संध्याकाळी एका कार्यक्रमासठी फरीदाबाद येथे दाखल झाले होते. याच कार्यक्रमात महिला IAS ऑफिसर आपलं कर्तव्य बजावत होती. कर्तव्यावर असताना एका विकृताने महिला ऑफिसरची छेड काढली. आरोपीने त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. महिला ऑफिसरने तातडीने याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिनांनी आरोपीला अटक केली.

संबंधित आरोपीचं नाव साहिल अधाना असं आहे. तो फरीदाबादच्या तीगांव या गावाचा रहिवासी आहे. महिला ऑफिसरने त्याच्याविरोधात FIR दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात कलम 354A आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपीला सोमवारी स्थानिक कोर्टात दाखल केलं असता कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तो आमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाहीच, जेजेपी पक्षाची भूमिका

दरम्यान, फरीदाबादचे जेजेपी पक्षाचे प्रवक्ता अरविंद भारद्वाज यांनी संबंधित आरोपी हा त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. कार्यक्रम सुरु असताना असे घाणेरडे कृत्य करुन कार्यक्रमला खराब करण्यासाठी त्याला पाठवण्यात आलंय, असं भारद्वाज म्हणाले आहेत (sexual harassment of woman IAS officer in deputy CM Dushyant Chautala programme).

हेही वाचा : ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझेंसोबत महिला, ‘त्या’ 5 बॅगांमध्ये काय; ‘एनआयए’कडून कसून चौकशी