AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझेंसोबत महिला, ‘त्या’ 5 बॅगांमध्ये काय; ‘एनआयए’कडून कसून चौकशी

सचिन वाझे हे 16 ते 20 फेब्रुवारी या काळात ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. | Sachin Vaze trident hotel

ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझेंसोबत महिला, 'त्या' 5 बॅगांमध्ये काय; 'एनआयए'कडून कसून चौकशी
सचिन वाझे
| Updated on: Mar 23, 2021 | 2:23 PM
Share

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपासयंत्रणेकडून (NIA) चौकशी सुरु असलेले API सचिन वाझे यांच्या ट्रायडंट हॉटेलमधील मुक्कामाचे आणखी काही तपशील समोर आले आहेत. त्यानुसार ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्यासोबत एक महिला दिसून आली होती. या महिलेच्या हातात पैसे मोजण्याचे मशीन होते. त्यामुळे ही महिला कोण, याचा तपास सध्या NIA करत आहे. (Sachin Vaze trident hotel five star hotel NIA probe)

राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी सचिन वाझे राहत असलेल्या ट्रायडंटमधील खोलीची झडती घेतली होती. याठिकाणी NIA च्या अधिकाऱ्यांचे जवळपास तीन तास सर्च ऑपरेशन सुरु होते. त्यानंतर NIA अधिकारी ट्रायडंट हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज घेऊन परतले होते. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सचिन वाझे हे 16 ते 20 फेब्रुवारी या काळात ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. त्यानंतर 24 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सोडण्यात आली होती. त्यामुळे हा संपूर्ण कट ट्रायडंट हॉटेलमध्येच शिजला का, याचा तपास NIAकडून सुरु आहे.

सचिन वाझेंकडे 5 बॅगा, महिलेकडे पैसे मोजण्याचे मशीन

सचिन वाझे यांनी बोगस आधारकार्ड दाखवून ट्रायडंट हॉटेलमध्ये प्रवेश मिळवला होता. यावेळी त्यांच्याकडे 5 बॅगा होत्या. यापैकी एका बॅगेत जिलेटीनच्या कांड्या असल्याचा NIAला संशय आहे. तसेच त्यांच्यासोबत एक महिलाही होती. या महिलेच्या हातात पैसे मोजण्याचे यंत्र होते. त्यामुळे ही महिलाही या कटात सहभागी होती का, याचा शोध NIA घेत आहे.

सध्या NIA सचिन वाझे यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवून प्रश्न विचारत आहे. 5 पैकी कोणत्या बॅगेत जिलेटीन होते, सोबतची महिला कोण होती, याबाबत सचिन वाझे यांना प्रश्न विचारले जात असल्याचे समजते.

सचिन वाझेंचे बनावट आधारकार्ड जप्त

सचिन वाझे यांचे बनावट आधारकार्ड समोर आलं आहे. याच आधारकार्डचा वापर करत वाझे हे ट्रायडेंट हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सचिन वाझे यांचे बनावट आधार नुकतंच समोर आलं आहे. सचिन वाझे हे याच आधार कार्डचा वापर करत असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे सचिन वाझे हे हेच आधार कार्ड वापरुन ट्रायडेंटमध्ये थांबले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सचिन वाझे यांच्या बनावट आधार कार्डवर सुशांत सदाशिव खामकर असे नाव देण्यात आले आहे. त्यावर वाढदिवसाची तारीखही लिहिण्यात आली आहे.

हप्ते वसुलीची डायरी हाती?

वाझेंच्या ऑफिसची झाडाझडती घेताना एनआयएच्या हाती सचिन वाझेंची डायरी लागली होती. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचंय, याचीही तारीख डायरीत नमूद करण्यात आली आहे. पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे. या डायरीतून हफ्त्याची गुपितं उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे.

संबंधित बातम्या : 

सचिन वाझेंची 200 पानी डायरी NIA च्या हाती, कोड लँग्वेजमधील हिशोब उघडकीस?

सचिन वाझेंचे बनावट आधारकार्ड जप्त, पंचतारांकित हॉटेलात सीसीटीव्ही NIA च्या ताब्यात

(Sachin Vaze trident hotel five star hotel NIA probe)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.